(Source: Poll of Polls)
Actresses Suffered From Miscarriage: पडद्यावर आनंदी, पण खऱ्या आयुष्यात आई होण्यासाठी टाकीचे घाव सोसले; आजही या अभिनेत्रींना बाळाची आस
Actresses Suffered From Miscarriage: चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक सौंदर्यवतींनी गर्भपाताचं दुःख सहन केलं. या यादीत शिल्पा शेट्टी, काजोलपासून गौरी खानपर्यंतची नावं आहेत.

Actresses Suffered From Miscarriage: आई... आईचं आपल्या आयुष्यात असणं म्हणजे काय? हे कुणीच शब्दात सांगू शकत नाही. नऊ महिने आपल्या पोटात वाढवून त्यानंतर ती बाळाला जन्म देते आणि न्हाऊ-माखू घालून त्याला मोठं करते. आई होणं म्हणजे, स्त्रीचा दुसरा जन्म. बॉलिवूडपासून भोजपुरी इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आई होण्यासाठी खूप संघर्ष केला. काही अभिनेत्री तर अशा आहेत, ज्या अनेक वर्षानंतरही आई होऊ शकल्या नाहीत. तर, काहींचा गर्भपात झालाय. त्यावर पर्याय म्हणून सरोगसी आणि आयव्हीएफद्वारे काही जणींनी मातृत्व स्विकारलं.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीनं 2012 मध्ये तिचा मुलगा वियानला जन्म दिला. याआधी शिल्पा 2010 मध्येही ती गर्भवती होती. परंतु, तिच्या गरोदरपणात काही गुंतागुंत निर्माण झाली, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. यामुळे शिल्पाला असं वाटू लागलं की, ती कधीही आई होऊ शकणार नाही. दरम्यान, अभिनेत्रीनं 2012 मध्ये एका मुलाला जन्म दिला. पण, अभिनेत्रीला एपीएस सिंड्रोम होता आणि प्रेग्नंसी कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी तिनं दुसऱ्या मुलासाठी सरोगसीचा मार्ग स्विकारला केला.

गौरी खान
सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानही गर्भपाताचं दुःख सोसलंय. याचा खुलासा स्वतः शाहरुख खाननं साजिद खानचा शो 'यारों की बारात'मध्ये केलेला. त्यानं सांगितलेलं की, 1997 मध्ये त्याचा मुलगा आर्यनच्या जन्मापूर्वी गौरीचा अनेकदा गर्भपात झालेला. त्यामुळे शाहरुख आणि गौरीनं तिसरा मुलगा अबरामच्या जन्मावेळी आयवीएफ आणि सरोगेसीचा आधार घेतलेला.

रानी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जीनं 2015 मध्ये एका मुलीला जन्म दिला. काही वर्षांनी तिला पुन्हा आई व्हायचं होतं. 2020 च्या अखेरीस मेलबर्नमधील भारतीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीनं ती दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचं जाहीर केलेलं. दरम्यान, पाच महिन्यांनंतर तिचा गर्भपात झाला आणि तिनं तिचं मूल गमावलं.

काजोल
अभिनेत्री काजोलला दोन मुलं आहे, मोठी मुलगी न्यासा आणि दुसरा मुलगा युग. पण, न्यासाच्या जन्मापूर्वी अभिनेत्री काजोलनं एकदा नाहीतर दोनदा मिसकॅरेज केलेलं. फार कमी लोकांना माहीत आहे की, फिल्म कभी खुशी कभी गमचं शुटिंग सुरू असताना काजोल प्रेग्नेंट होती.
संभावना सेठ
भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठनं 2016 मध्ये अभिनेता अविनाश मिश्रासोबत लग्न केलं. लग्नाच्या 9 वर्षांनंतरही संभावना आई होऊ शकलेली नाही. जरी संभावना गेल्या वर्षी 2024 मध्ये पहिल्यांदा गर्भवती राहिली असली तरी तीन महिन्यांनी तिचा गर्भपात झालेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :



















