एक्स्प्लोर

Actress Veena Jamkar On Vijay Kalamkar: 'तू Super Hit है बॉस...','कुर्ला टू वेंगुर्ला'च्या दिग्दर्शकासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

Actress Veena Jamkar On Vijay Kalamkar: तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप ह्या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना, असं अभिनेत्री विणा जामकरनं (Veena Jamkar) म्हटलं आहे. 

Actress Veena Jamkar On Vijay Kalamkar: गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट 'कुर्ला टू  वेंगुर्ला' या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. उत्तमोत्तम कलाकारांची मांदियाळी असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, एक वेगळा विषय हाताळल्यामुळे दिग्दर्शकाचं कौतुक केलं जात आहे. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं दिग्दर्शक विजय कलमकर यांचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप ह्या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना, असं अभिनेत्री विणा जामकरनं (Veena Jamkar) म्हटलं आहे. 

वीणा जामकरची फेसबुक पोस्ट 

वीणा जामकरनं दिग्दर्शक विजय कलमकर यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये विणानं लिहिलंय की, "तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप ह्या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना... ज्या लाभतात अर्थातच दुःख -संकटांचा सामना करूनच. आणि ह्या संवेदना जोपासायच्या कि प्रवाह - पतीत होऊन सोडून द्यायच्या ह्याची पण निवडच करावी लागते! तू ती केलीस..."

"तू 'सिनेमा दिग्दर्शक ' म्हणून खास आहेस. दोन्ही पायांना पोलिओ असलेली व्यक्ती सिनेमा दिग्दर्शक कशी बरं होऊ शकते असं मलाही वाटलंच होतं तुझ्याकडे बघून. पण मी वेळोवेळी अनुभवलं ते तुझ्यात 'नसलेलं ' मानसिक अपंगत्व, जे आमच्यापैकी बहुतेक जणांकडे थोडं फार आहेच. कल्पना करूनही समजू शकत नाही इतक्या अवहेलनेला सामोरं जाऊनही तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं... अन्यायग्रस्त माणसाचं ' रडणं ' आणि त्या 'रडण्याचंच' भांडवल करणं हे तुझ्याकडून अपेक्षित असलेले ' गुण ' तुझ्या आसपासही फिरकत नाहीत.. आणि तिथेच तू खूप मोठा होतोस..!", असं विणा जामकर म्हणाली आहे.  

पुढे विणानं लिहिलंय की, "कुर्ला टू वेंगुर्ला"चं बॉक्स ऑफिस वर कलेक्शन किती ह्यावर तुझं यश ठरत नाही.. तू तेव्हाच सगळं जिंकलंस जेव्हा पहिल्यांदा हातातली काठी बाजूला सारून, तू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर विराजमान झालास... काय वाटलं असेल तेव्हा तुला...?"

"लाडक्या, Thank You Very Much...तू तुझ्याच अस्तित्वाला अर्थ दिलास त्यासाठी! नाहीतर माझ्यासारख्या अनेकांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुठून बळ मिळालं असतं? तू Super Hit है बॉस...", असं विणा जामकर म्हणाली. 

"अभिनेता कितीही उत्तम असो त्याला पाठबळ नसेल तर तो सगळं टॅलेंट असूनही अपंगच रहातो. आज आमचं पाठबळ ठरला आहे श्री. अमरजीत आमलेंचा " स्पंदन " परिवार.  स्पंदन फिल्म मूव्हमेंट. कुणाच्या फिल्मसाठी एखादा गडगंज श्रीमंत हात पुढे करतो, कुणाच्या पाठीमागे पिढीजात सिनेमा धंद्यातला अनुभव कमी येतो. आमच्या पाठीशी आज 'स्पंदन परिवार' उभा राहिला आहे. अमरजीत आमले आहेत. ऐकल्यावर कोणीही वेड्यात काढेल अशी चित्रपटनिर्मितीची चळवळ गेली 30 वर्ष गावोगावी चालवणारी  'कलंदर' व्यक्ती सिस्टीम ला आव्हान देणार नाही तर कोण देणार? ज्यांनी जगताना कधीच सरधोपट फायदा - तोट्याचा विचार केला नाही, अशीच व्यक्ती ' धमक ' दाखवून स्वतःच्या हिमतीवर चित्रपट वितरीत करायचा विचार करू शकते...! इतकं चित्रपटाचं वेड असलेली माणसं दुर्मिळ. तरीही ह्या वेडेपणात किती 'शहाणपण ' लपलेलं आहे हे चित्रपट पाहिल्यावर अधोरेखित होतं...", असं विणा जामकर म्हणाली. 

"स्पंदन' परिवाराने मला काय दिलं? जेव्हा जेव्हा मी ग्रूप च्या सानिध्यात येते,  तेव्हा तेव्हा काही क्षण मी अंतर्मुख होते. मला आतल्या आत सुरक्षित वाटतं. आपण कामाचा मोबदला देऊन गोड गोड बोलून वापरले जातोय हा सर्रास येणारा अनुभव तुमच्यात आल्यावर येत नाही.. थोडक्यात, तुमच्या ग्रूप मधे माझ्याही स्पंदनांचे ठोके नियमित पडतात!", असं विणा जामकर म्हणाली. 

विणा जामकर म्हणाली की, "स्पंदन' परिवारातल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या चित्रपटासाठी जे अहोरात्र कष्ट घेताय... कितीही पगार दिला तरी कामाप्रती अशी सदभावना कोणी विकत घेऊ शकत नाही. ह्या आत्मियतेने तुम्ही फिल्म घराघरात पोहोचावी म्हणून प्रयत्न करताय.. तुमचं शब्दात मावणार नाही एवढं कौतुक, अभिनंदन, आभार आणि सलाम!!!!  Paid Advertising च्या जमान्यात तुमच्या एकजूटीने वाजवलेला चित्रपटाचा डंका अखंड वाजत राहूदे ह्यापुढेही.. कारण ह्या तुमच्या आवाजाने फक्त प्रमोशन होणार नाही तर  सिनेमाच्या 'शुष्क कोर्पोरेट ' जगालाही मधून मधून आठवत राहिल की आपल्या आसपास काही 'माणसं ' शिल्लक आहेत... स्पंदन परिवाराला अंत:करणातून शुभेच्छा, प्रेम आणि शतशः आभार!!! Love You All...- वीणा जामकर."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gautami Patil Navratri Special Song Video: आई गोंधळाला ये..! गौतमी पाटीलचं आई तुळजाभवानी चरणी साकडं, नवरात्रीनिमित्त खास गाणं प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office: इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Embed widget