Video : 'मोहे पनघटपे....'; मुलीला नृत्याचे धडे देतेय उर्मिला कोठारे
उर्मिला कोठारे हिनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एचा गुरुच्या भूमिकेत दिसत आहे.
मुंबई : प्रत्येक कला शिकण्यासाठी आपल्याला कोणा एका रुपात गुरुची साथ मिळतेच. फक्त कलाच नव्हे, तर जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये गुरुच्याच मार्गदर्शनाच्या बळावर आपण सक्षम असे निर्णय घेतो. त्यामुळं एक गुरु होणं हे सोपं काम नाही, कारण तुमच्यावर जबाबदारी एक व्यक्ती, एक कलाकार घडवण्याची.
सध्या अशीच जबाबदारी पार पाडत आहे, अभिनेत्री उर्मिला कोठारे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या उर्मिला कोठारे हिनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एचा गुरुच्या भूमिकेत दिसत आहे. एक आई असण्यासोबतच ती आता आपल्या मुलीसाठी गुरुही झाली झाली.
...तर शॉक लागून मी जिवंत होईन, आदिनाथच्या पोस्टने पिकवला हशा
जिजा, या लाडक्या लेकीला उर्मिला नृत्याचे धडे देत आहे. मुख्य म्हणजे तिनं शेअर केलेला व्हिडीओ पाहता, या कलेचा वारसा मुलीला देण्यात ती बऱ्याच अंशी यशस्वी ठरत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मदर्स डे, च्या निमित्तानं उर्मिलानं एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती 'मोहे पनघट पे...', या गाण्यावर सुरेख नृत्य करताना दिसत आहे. सोबतच ती जिजालाही नृत्यकलेचे धडे देत आहे. चिमुकली जिजा आपल्या आईचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यामुळं येत्या काळात तीसुद्धा आईप्रमाणं नृत्यात पारंगत झाली तर त्याच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
View this post on Instagram
उर्मिलानं जिजासोबतचा हा गोड व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनीच तो लाईक केला, तर काहींनी कमेंट करुन या आईमुलीच्या जोडीचं कौतुक केलं. आई म्हणून आपल्या खांद्यावर आलेल्या अनेक जबाबदाऱ्यांसोबतच उर्मिला तिच्या मुलीला कलेचाही वारसा देत असल्याचं पाहून चाहत्यांच्याही चेहऱ्यावर स्मित खुललं.