Actress Tortured By Ex Husband: 'आजारी असतानाही जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं वाचला नवऱ्याच्या कुकर्मांचा पाढा
Actress Tortured By Ex Husband: मनोरंजन क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी खुलासा केला की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना खूप समस्या आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना खूप त्रास दिला आहे.

Actress Tortured By Ex Husband: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री 'बडे अच्छे लगते हैं' आणि 'कुबूल है' फेम चाहत खन्ना (Chahatt Khanna), बऱ्याच काळापासून लाईमलाईटपासून दूर आहे. अशातच तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे. या मुलाखतीत बोलताना चाहत खन्नानं वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. चाहतनं अनेक खळबळजनक खुलासे केले असून ते ऐकून चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. चाहतनं सांगितलं की, तिच्या एक्स-हसबंड तिच्यावर खूप अत्याचार करायचा. तसेच, तिच्या पतीनं तिनं इस्लाम धर्म स्वीकारण्यापासून इतर अनेक कारणांवरुन केलेल्या मानसिक छळाबद्दलही अभिनेत्री मोकळेपणानं बोलली.
मनोरंजन क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी खुलासा केला की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना खूप समस्या आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना खूप त्रास दिला आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसणारी एक लोकप्रिय अभिनेत्री दोनदा लग्न केली होती. पण तिला तिच्या कोणत्याही पतीकडून प्रेम मिळालं नाही. तिला तिच्या दुसऱ्या पतीकडूनही खूप छळ सहन करावा लागला. या टीव्ही अभिनेत्रीनं यापूर्वीही खुलासा केलेला की, तिचा पती फार छळ करायचा.
अभिनेत्रीनं 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, अभिनेत्रीनं 2006 मध्ये उद्योगपती भरत नरसिंहानशी लग्न केलं होतं. पण काही महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिनं बॉलिवूड लेखक शाहरुख मिर्झाचा मुलगा फरहान मिर्झाशी लग्न केलं. त्याच्यापासून तिला दोन मुली झाल्या. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीनं इस्लाम धर्म स्वीकारला. पण, लैंगिक शोषण आणि मानसिक छळामुळे तिनं 2018 मध्ये घटस्फोट घेतला. चाहत खन्नानं तिचा पती भरत नरसिंहान याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. याच कारणामुळे त्यांनी भरत नरसिंहान यांना घटस्फोट दिला होता, असं चाहत खन्ना म्हणाली.
View this post on Instagram
घरगुती हिंसाचाराचे आरोप
चाहत खन्नालाही तिच्या दुसऱ्या लग्नापासून दोन मुली होत्या आणि 2018 मध्ये हे लग्नही तुटलं. अभिनेत्रीनं तिचा दुसरा पती फरहानवर घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. चाहत खन्नानं तिचा पती फरहान मिर्झावर असाही आरोप केला होता की, तो बिनकामाचा आहे आणि पैशासाठी तिचा छळ करतो. तो कोणतंही काम करत नाही आणि तिला कमी लेखण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तो तिच्यावर जबरदस्तीही करायचा.
आजारपणातही शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती
चाहत खन्नानं असंही म्हटलं होतं की, मी आजारी असूनही तो शारीरिक संबंधाची मागणी करायचा. पण, फरहान मिर्झानं असा दावा केला होता की, चाहत खन्नाचे रिभू मेहरासोबत प्रेमसंबंध होते आणि अभिनेत्रीनं स्वतःही हे मान्य केलं होतं. अभिनेत्रीनं असंही सांगितलं होतं की, तिचा पती प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी तिचं नाव वापरतोय.
चाहतचं रिभू मेहरासोबत अफेअर?
चाहत खन्नानं रिभू मेहरासोबतच्या तिच्या नात्याबद्दल म्हटलं होतं की, आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत आणि हेच सत्य आहे. फरहानला संशय घेण्याची सवय आहे. चाहत खन्नानं सांगितलं की, तिनं फरहानसमोर सर्वकाही स्वीकारलं होतं, कारण ती त्यावेळी खूप दुःखी होती. तिला हे प्रकरण पूर्णपणे संपवायचं होतं आणि म्हणूनच तिनं हे केलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























