एक्स्प्लोर

Bollywood Actress Gracy Singh News: आमिर खान, संजय दत्त, अजय देवगणची हिरोईन बनली ब्रह्मकुमारी, ग्लॅमरस जग सोडून अध्यात्माच्या वाटेवर

Bollywood Actress Gracy Singh News: ग्रेसी सिंगनं तिच्या करिअरची सुरुवात शास्त्रीय नृत्यांगणा म्हणून केली. त्यानंतर तिने 1997 मध्ये टेलिव्हिजन शो अमानतमधून अभिनयाच्या जगतात पदार्पण केलं.

Bollywood Actress Gracy Singh News: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) ग्रेसी सिंह (Gracy Singh) लगान सिनेमातील गौरीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. लगानमधल्या आमिर खान आणि ग्रेसी सिंहच्या भूमिकेवर म्हणजेच, भुवन आणि गौरीच्या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. लगानमधल्या भूमिकेमुळे ग्रेसी सिंहला रातोरात ओळख मिळाली. याशिवाय ग्रेसी सिंह लगाननंतर मुन्नाभाई एमबीबीएस आणि गंगाजलमध्येही दिसून आली. या दोन्ही चित्रपटांमध्ये ग्रेसी सिंहनं मोलाची भूमिका निभावली. अल्पावधीच बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींमध्ये ग्रेसी सिंहच्या नावाचा समावेश होऊ लागला. पण, आता अभिनेत्रीनं ग्लॅमरस जग आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेलं करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला.  

यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना निवडला अध्यात्माचा मार्ग 

ग्रेसी सिंगनं तिच्या करिअरची सुरुवात शास्त्रीय नृत्यांगणा म्हणून केली. त्यानंतर तिने 1997 मध्ये टेलिव्हिजन शो अमानतमधून अभिनयाच्या जगतात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं काही चित्रपटांमधील अभिनयानं  सर्वांना आपलंस केलं. पुढे तिच्या पदरात शर्ट, मुन्नाभाई एमबीबीएस, गंगाजल, मुस्कान, ये ही है जिंदगी यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे पडले. या सिनेमांमधील आपल्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिनं काही प्रादेशिक सिनेमेसुद्धा केले.  2008 मध्ये ग्रेसीच्या मॅनेजरचं निधन झालं, त्यानंतर मात्र तिला फारशा ऑफर मिळाल्या नाहीत. पुढे ग्रेसीनं स्वतःच अभिनयापासून फारकत घेतली. त्यावेळी एका मुलाखतीत बोलताना ग्रेसी सिंहनं सांगितलं की, अभिनय तिच्या आयुष्याचं ध्येय नाही. सर्वात शेवटी ग्रेसी सिंह संतोषी माँ- सुनय व्रत कथायें या शोमध्ये दिसून आलेली. 

ग्रेसी सिंहनं अभिनय सोडला

2013 मध्ये, ग्रेसी सिंहनं एक नवा मार्ग निवडला. तिनं ब्रम्हकुमारी संस्थेचं सदस्यत्व घेतलं आहे. ती ब्रह्मकुमारींमध्ये सामील झाली आणि अध्यात्माचा मार्ग निवडला. तिथे ती शांती आणि उद्देशाची खोल भावना शोधत होती. ती ब्रह्मकुमारी इथे ग्रेसी तिच्या शास्त्रीय नृत्याद्वारे आध्यात्मिक संदेश देते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gracy Singh (@iamgracysingh)

44 वर्षांची अभिनेत्री अविवाहित 

ग्रेसी सिंहचं अद्याप लग्न झालेलं नाही. ती 44 वर्षांची असून अविवाहित आहे. 2020 मध्ये, ग्रेसी सिंहनं ईटाइम्सशी बोलताना सांगितलं की, सध्या ती लग्नाचा विचार करत नाही. कदाचित ती भविष्यात कोणाशी तरी लग्न करेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'पुरुषांना इशारा करणारी..', काळी-कुरुप म्हणत निर्माते काम देत नव्हते, नर्गिसने सार्वजनिकरित्या अभिनेत्रीला म्हटलं होतं 'डायन'

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget