VIDEO : अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा भन्नाट डान्स, मुन्नवर फारुकीसोबत थिरकली, व्हिडीओ तुफान व्हायरल
Actress Sonali Bendre dance video : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुन्नावर फारुकीसोबत भन्नाट डान्स केलाय.

Actress Sonali Bendre dance video : अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि टिव्ही अभिनेता मुन्नावर फारुकी यांचा डान्स व्हिडीओ (Actress Sonali Bendre dance video ) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. सोनाली बेंद्रे आणि मुन्नावर फारुकी टिव्हीवरील एक रिअॅलिटी शो होस्ट करताना पाहायला मिळणार आहेत. त्यापूर्वी ते अनेकदा एकत्र स्पॉट झालेले देखील पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या दोघांचा डान्स व्हिडीओ (Actress Sonali Bendre dance video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सोनाली बेंद्रे हिने लाल रंगाची साडी नेसली आहे. दोघांच्या या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतोय. (Actress Sonali Bendre dance video)
View this post on Instagram
कलर्स टीव्हीवर लवकरच एक नवा आणि रंजक रिअॅलिटी शो 'पति, पत्नी और पंगा : जोड्यांचा रिअॅलिटी चेक' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा शो प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे होस्ट करणार आहेत. या शोमध्ये टीव्ही आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय जोड्या त्यांच्या नात्यातील घट्टपणा आणि केमिस्ट्रीची परीक्षा मजेदार टास्क आणि आव्हानांच्या माध्यमातून देणार आहेत.
शोचा फॉरमॅट काय आहे?
‘पति, पत्नी और पंगा’ या शोमध्ये प्रत्येक भागात जोड्यांना वेगवेगळे टास्क आणि गेम्स दिले जातील, ज्यातून त्यांची टीमवर्क, समजूतदारपणा आणि खरी बॉन्डिंग तपासली जाईल. कधी हलकेफुलके भांडण, कधी रोमँटिक क्षण, तर कधी धमाल विनोद पाहायला मिळेल. या शोचे उद्दिष्ट प्रेक्षकांना सेलिब्रिटी कपल्सच्या खऱ्या नात्याची झलक दाखवणे हे आहे — जी सोशल मीडियावर दिसणाऱ्या इमेजपेक्षा खूपच रिअल आणि वेगळी असेल.
शो कधीपासून प्रसारित होणार?
हा शो ‘लाफ्टर शेफ्स सिझन 2’ची जागा घेणार असून याची शूटिंग सुरू झालेली आहे. लवकरच याचा प्रोमो टीव्ही आणि सोशल मीडियावर झळकणार आहे. शोच्या प्रसारणाची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल. त्याचबरोबर या शोतील स्पर्धक जोड्यांची अधिकृत घोषणा देखील लवकरच होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























