एक्स्प्लोर

Snehal Tarde on Deool band 2: 'स्वामी समर्थांची परीक्षा घेणारी व्यक्ती..' देऊळ बंद 2 चे पोस्टर लॉन्च होताच अभिनेत्री स्नेहल तरडे म्हणाली..

Snehal Tarde on Deool Band 2: 2015 नंतर या चित्रपटाचा आणखी एक भाग यावा अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आलीय.

Snehal Tarde Deool Band 2: देऊळ बंदला चित्रपटगृहात दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देऊळ बंद 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला होता तर 'देऊळ बंद 2'मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान, निर्माता प्रवीण तरडेची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेची (Snehal Tarde) प्रतिक्रिया चर्चेत आलीय. 

देऊळ बंद 2- आता परीक्षा देवाची'च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेनं हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आहे आणि डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत, आता हा राग कशासाठी आणि दुःख कशाचे? यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे. "भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात...", हाच संदेश या पोस्टरमधून अधोरेखित होतोय.  

काय म्हणाली अभिनेत्री स्नेहल तरडे?

स्नेहल म्हणाली, 'सद्गुरू स्वामी समर्थांची परीक्षा घेणारी व्यक्ती या जगात जन्माला आलेली नाही. हे धाडस एक मायमाउलीच करू शकते. स्वतःच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटते आहे, कष्ट करते आहे. आणि म्हणूनच गुरुमाउली स्वामी समर्थदेखील 'देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची' या सिनेमात हसत-हसत या मायमाउलीच्या परीक्षेला सामोरं जाणार आहेत. सिनेमात प्रेक्षकांना श्रद्धा आणि वास्तव यांचा एक वेगळाच संगम अनुभवायला मिळेल."

21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित 'देऊळ बंद 2' ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाने, प्रेक्षकांच्या मनात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलं होतं. हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. 2015 नंतर या चित्रपटाचा आणखी एक भाग यावा अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आलीय.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget