Actress Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर 4 वर्षांनी समंथा रुथ प्रभूने रिमुव्ह केला 'तो' टॅटू
Actress Samantha Ruth Prabhu remove tattoo : नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर 4 वर्षांनी समंथा रुथ प्रभूने रिमुव्ह केला 'तो' टॅटू

Actress Samantha Ruth Prabhu remove tattoo : दाक्षिणात्य सिनेक्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Actress Samantha Ruth Prabhu) सिनेमांची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही होते. समंथाची लव्हस्टोरी, ब्रेकअप ते घटस्फोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. समंथा रुथ प्रभूने (Actress Samantha Ruth Prabhu) साऊथ आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा 2010 साली ‘ये माया चेसवे’ (YMC) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्यांच्या लवस्टोरीला सुरुवात झाली होती.
सिनेमात काम करण्यासाठी एकत्र आल्यानंतर काही वर्षांतच समंथा आणि नागा चैतन्य या दोघांची जोडी साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत आली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि प्रेम फुललं. यानंतर 2017 मध्ये या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने एक भव्य लग्नसोहळा आयोजित केला. मात्र, लग्नाच्या चार वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला आणि अधिकृतरित्या ते वेगळे झाले. गेल्या वर्षी नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिच्याशी लग्न केलं आणि सध्या सामंथाचं नाव ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शक राज निदीमोरु यांच्याशी जोडलं जात आहे.
View this post on Instagram
सामंथाने नागा चैतन्यसोबतच्या नात्यादरम्यान आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तीन टॅटू काढले होते. त्यामध्ये सर्वात मोठा टॅटू तिच्या मानेला ‘YMC’ असं लिहिलेला होता. हा टॅटू सामंथाने तिच्या आणि नागाची पहिली फिल्म ‘ये माया चेसावे’ (YMC) याला समर्पित केला होता. याच चित्रपटातून दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. पण आता घटस्फोटानंतर 4 वर्षांनी अशा चर्चा आहेत की सामंथाने हा टॅटू काढून टाकला आहे.
सामंथाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बर्गंडी रंगाचा बॅकलेस ड्रेस घालून आहे. या व्हिडिओमध्ये ती एक पारदर्शक काचेवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. मात्र, लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे तिच्या मानेला असलेला YMC टॅटू या व्हिडिओमध्ये दिसत नाही, ज्यामुळे तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
नेटकऱ्यांनी कमेंट करून टॅटूबाबत विचारले प्रश्न
सामंथाच्या या व्हिडिओवर एक युजर म्हणतो, “सामंथाने आपला YMC टॅटू काढून टाकलाय.” दुसरा युजर म्हणाला, “हा टॅटू फाउंडेशनने झाकलेला असावा, कारण हे फक्त अॅडसाठी आहे.” तिसऱ्याने लिहिलं, “एक क्षण वाटलं काहीतरी वेगळंच आहे.”
राज निदीमोरु यांच्यासोबत एकत्र राहणार असल्याची चर्चा
नागा चैतन्यने आता शोभिता धुलीपाला हिच्याशी लग्न केलं असून, सामंथाचं नाव सध्या दिग्दर्शक राज निदीमोरु यांच्यासोबत जोडलं जात आहे. ते अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. अलीकडच्या रिपोर्टनुसार, सामंथा आणि राज एकत्र राहण्याची योजना करत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितलं, “ते सध्या एक फ्लॅट शोधत आहेत... राजने 2022 मध्ये श्यामलीपासून अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आणि ‘सिटाडेल’ चित्रपटादरम्यान सामंथाच्या प्रेमात पडला.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
भर पावसात गौतमी पाटीलचा मोहात पाडणारा डान्स, अलका यागनिक यांच्या गाण्यावर थिरकली VIDEO























