एक्स्प्लोर

Saie Tamhankar On Working With New Directors: ...म्हणून नव्या दिग्दर्शकाच्या सोबतीनं काम करायला आवडतं; सई ताम्हणकरचं रोखठोक मत

Saie Tamhankar On Working With New Directors: अनेक बड्या आणि नामांकित बॉलिवूड आणि मराठी दिग्दर्शकांसोबत आजवर काम केल्यानंतर सई लवकरच  'तुंबाडची मंजुळा' सिनेमाचा भाग होणार आहे.

Saie Tamhankar On Working With New Directors:  मराठी सिनेसृष्टीच्या (Marathi Film Industry) आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मराठमोळ्या सई ताम्हणकरनं (Marathi Actress Saie Tamhankar) आजवर अनेक मराठी (Marathi Movie) आणि त्यासोबतच हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Cinema) काम केलंय. ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिनं थेट सिनेमांमध्ये एन्ट्री घेतली. आजवर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अशातच वर्सटाईल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. सईनं आजवर अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलंय. नव्या दिग्दर्शकाच्या सोबतीने काम करायला आवडतं, असं अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली. 

सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? 

अनेक बड्या आणि नामांकित बॉलिवूड आणि मराठी दिग्दर्शकांसोबत आजवर काम केल्यानंतर सई लवकरच  'तुंबाडची मंजुळा' सिनेमाचा भाग होणार आहे. या सिनेमात देखील तिनं एका नव्या दिग्दर्शकासोबत काम केलं असून नवा दिग्दर्शक नव्या लोकांसोबत काम करण्याबद्दल सई ताम्हणकर म्हणाली की, "नव्या व्यक्तींसोबत आणि त्यांच्या पहिल्या प्रकल्पासाठी काम करणं हे नेहमीच खास असतं आणि यामुळे मला नेहमी ही जाणीव अधिक ठळकपणे होते की, जेव्हा मी या इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा अनेक लोकांनी आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. ही भावना खूप प्रेरणादायी आणि सामर्थ्य देणारी असते आणि जर मी तीच भावना त्यांच्या पहिल्या सिनेमावर काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकले तर ते खरोखरंच अर्थपूर्ण आणि प्रभावी ठरतं..." 

"याशिवाय मला नेहमी वेगवेगळ्या कार्यपद्धती असलेल्या दिग्दर्शकांसोबत, विविध प्रकारच्या वातावरणात काम करायला आवडतं. एखाद्याच्या पहिल्या आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टचा भाग होणे हेही नेहमीच विशेष असतं आणि ती भावना मला खूप आवडते ती समृद्ध करणारी असते. कोणत्याही स्वरूपात नव्या आवाजांना आणि नव्या प्रतिभेला पाठिंबा देण्यात एक वेगळ्याच प्रकारचे समाधान मला मिळतं...", असं सई ताम्हणकर म्हणाली. 

दरम्यान, क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आपल्या वेगळ्या आणि दर्जेदार भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत तिनं आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली असून, विविध प्रकारच्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारत तिनं आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. नावीन्यपूर्ण भूमिका आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सई ताम्हणकरनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपत तिनं अनेक लक्षवेधी पात्रांना न्याय दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan Was Not First Choice For Maine Pyar Kiya: 'मैंने प्यार किया'मध्ये सलमान खान ऐवजी दिसला असता 'हा' प्रसिद्ध खलनायक; पण ऐनवेळी नियतीनं डाव टाकला अन् भाईजान चमकला

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget