'नॅचरल डिलिव्हरी'वरुन ट्रोलिंग, Fukrey फेम ऋचा चड्ढा भडकली, म्हणाली; 'माझी योनी, माझं बाळ, माझे शब्द...'
Actress Richa Chadha : मुलगी जुनैराच्या वाढदिवशी रिचा चढ्ढा हिने तिच्या आई होण्याच्या प्रवासाची एक भावनिक कहाणी शेअर केली, ज्यामध्ये तिने नॅचरल डिलिव्हरीचा उल्लेख केला. ट्रोलर्सनी याला वादात रूपांतरित केले, परंतु रिचाने त्याला योग्य उत्तर दिले.

Actress Richa Chadha : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा हिचा आई झाल्यापासूनचा मातृत्वाचा प्रवास खूप आनंदाने सुरू आहे. 16 जुलै रोजी तिची लहानगी मुलगी 'ज़ुनेयरा' एक वर्षांची झाली, त्यानिमित्ताने ऋचाने एक भावनिक रील शेअर केलं. या रीलमध्ये तिच्या गर्भावस्थेपासून ते आई होण्यापर्यंतचे सुंदर क्षण दाखवले होते. मात्र, ऋचाच्या या आनंदी क्षणात काही ट्रोलर्सनी वाद निर्माण केला. कारण एवढंच की ऋचाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की तिची डिलिव्हरी ‘नेचुरल बर्थ’ होती. ऋचा चड्ढा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नेहमीच आपले खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
View this post on Instagram
आई झाल्याच्या एका वर्षपूर्तीनिमित्त ऋचाने मुलीच्या आठवणींसह एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं –"एक वर्षांपूर्वी मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये एका निरोगी मुलीला जन्म दिला. डिलिव्हरी फक्त 20 मिनिटांत झाली, Natural Birth ! त्यानंतर आयुष्य कधीच तसंच राहिलं नाही, विशेषतः माझ्यासाठी… मी आतून बाहेरपर्यंत बदलले आहे… माझं मन, माझं हृदय, माझं शरीर, माझं आत्मा. ज़ुनेयरा एक वर्षांपूर्वी जन्मली आणि मी सुद्धा. आई म्हणून माझा पुनर्जन्म झाला. एक पूर्णपणे नवीन अस्तित्व, जे पूर्वी होतं त्यापेक्षा वेगळं."
काहींना भावलं, काहींना ‘नेचुरल बर्थ’ची झाली अडचण
ऋचाने पुढे लिहिलं, "माझ्या स्वप्नातल्या माणसासोबतचं आयुष्य आणि बाळ… जर हे आशीर्वाद नसेल तर मग काय आहे?" काही लोकांना ऋचाची ही पोस्ट खूप आवडली, पण काहींना तिचं "Natural Birth" असं लिहिणं अजिबात पटलं नाही.
ट्रोल्सना ऋचाची खडी उत्तरं
काही ट्रोल्सना ऋचाचं “Natural Birth” म्हणणं खटकलं. एका युझरने लिहिलं, "प्रत्येक Birth Naturalच असते, आजकाल सायन्सच्या मदतीने डिलिव्हरी होते." त्यावर ऋचाने लगेच उत्तर दिलं, "जर मी 'नॉर्मल डिलिव्हरी' म्हटलं असतं तरी तुम्ही काहीतरी बोललाच असता."
एका युझरने सांगितलं की तिने "वेजाइनल डिलिव्हरी" म्हणायला हवं होतं, त्यावर ऋचाने परखड उत्तर दिलं, "जर मला 'वेजाइनल डिलिव्हरी' म्हणायचं नसेल तर? ही माझी पोस्ट आहे, माझं शरीर, माझी योनी आणि माझं बाळ. फेमिनिझमने मला शिकवलंय की मी माझे शब्द स्वतः निवडू शकते." यानंतर ऋचाने ते संपूर्ण कमेंट सेक्शन हटवलं, पण स्पष्ट केलं की तिला आपल्या शब्दांबद्दल कोणताही पश्चाताप नाही.
‘Natural डिलिव्हरी’ शब्दावर आधीही झाला होता वाद
ही काही पहिली वेळ नाही की एखाद्या सेलिब्रिटीला “Natural डिलिव्हरी” या शब्दावरून टीकेला सामोरं जावं लागलं आहे. काही आठवड्यांपूर्वी सुनील शेट्टीलाही अशाच टीकेचा सामना करावा लागला होता, जेव्हा त्याने आपल्या मुली अथिया शेट्टीने सी-सेक्शनशिवाय बाळंतपण केल्याबद्दल कौतुक केलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शोलेमधील गब्बरचा अड्डा नेमका कुठंय? शूटिंग कुठं झालंय? निर्मात्यांनी लोकशनजवळ पोहोचण्यासाठी बनवलेला रस्ता























