शोलेमधील गब्बरचा अड्डा नेमका कुठंय? शूटिंग कुठं झालंय? निर्मात्यांनी लोकशनजवळ पोहोचण्यासाठी बनवलेला रस्ता
Sholay Movie Shooting Location : अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा 'शोले' हा चित्रपट संस्मरणीय चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली होती.

Sholay Movie Shooting Location : रमेश सिप्पी यांच्या शोले या चित्रपटाशी अनेक रंजक किस्से जोडले गेले आहेत. 1975 मध्ये आलेल्या या आयकॉनिक चित्रपटाने कलाकारांसह, चित्रपट जिथे शूट झाला त्या ठिकाणालाही प्रसिद्ध केलं. शोलेची पूर्ण कथा रामगढ नावाच्या गावाभोवती फिरते. संपूर्ण चित्रपटात या गावाला उत्तर भारतातील एक गाव दाखवण्यात आलं आहे, पण सत्य या कल्पनेच्या पलीकडचं आहे – म्हणजेच थक्क करणारे.
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र अन् अमजद खान यांची मुख्य भूमिका
संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, अमजद खान, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांनी शोलेमध्ये महत्त्वाची पात्रं साकारली आहेत. चित्रपटाची कथा दोन मित्र जय आणि वीरूभोवती फिरते, जे पात्र अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारले. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याद्वारे क्रूर डाकू गब्बर सिंगला पकडण्यासाठी त्यांना कामावर ठेवले जाते. या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट आहे जी सर्व पात्रांना जोडून ठेवते – ती म्हणजे रामगढ गाव.
शोलेचं रामगढ नेमकं कुठे आहे?
शोले मधील रामगढ हे दक्षिण भारतात वसलेलं आहे. हे कर्नाटकातील बेंगळुरू जवळील रामनगर या डोंगराळ भागात आहे. या भागात चित्रपटाची शूटिंग करणे सहज शक्य नव्हते. निर्मात्यांना बेंगळुरू हायवेपासून रामनगरपर्यंत एक लांब रस्ता तयार करावा लागला, जेणेकरून शूटिंगचे साहित्य आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्थित पोहोचू शकेल. इतकंच नाही तर शोलेमधील रामगढ गावसुद्धा खास तयार करण्यात आलं, जे आर्ट डायरेक्टर राम येडेकर यांनी बनवलं होतं.
जेव्हा गावाचंच नाव बदललं
कधीकाळी रामनगरमधील एका भागाचं नाव दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या नावावरून ‘सिप्पी नगर’ असं ठेवलं गेलं होतं, असं म्हटलं जातं. आता ही जागा एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनली आहे. रामनगरला भेट देणाऱ्यांना त्या डोंगरांवर जाण्याची संधी मिळते, जिथे गब्बर सिंग आणि त्याच्या साथीदारांचं अड्डा दाखवलं होतं. मात्र, चित्रपटातील बरेच प्रसंग या गावात प्रत्यक्ष शूट करण्यात आले नव्हते.
ही ठिकाणंही बनली शोलेचा भाग
शोलेतील तुरुंगाचे आणि ट्रेन डकैतीचे काही प्रसंग रामनगरच्या बाहेर शूट करण्यात आले होते. तुरुंगाचा सेट मुंबईतील राजकमल स्टुडिओच्या जवळ तयार करण्यात आला होता, जेणेकरून नैसर्गिक सूर्यप्रकाशात शूटिंग करता येईल. तसंच “ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे” हे गाणं पुणे आणि पनवेलच्या रस्त्यावर शूट करण्यात आलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऋषी कपूरच्या हिरोईनचं गाणं, बोल्डनेस पाहून सेन्सॉर बोर्डही झाला होता हैराण, आजची होते तेवढीच चर्चा
























