दत्तक घेतलेल्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट येताच मंदिरा बेदीचा संताप अनावर
ऑक्टोबर महिन्यात अभिनेत्री, प्रेझेंटर आणि फिटनेस एंथुझिअॅस्ट अशी ओळख असणाऱ्या मंदिरा बेदी हिनं एका मुलीला दत्तक घेतलं होतं
मुंबई : ऑक्टोबर महिन्यात अभिनेत्री, प्रेझेंटर आणि फिटनेस एंथुझिअॅस्ट अशी ओळख असणाऱ्या मंदिरा बेदी हिनं एका मुलीला दत्तक घेतलं होतं. राज कौशल आणि मंदिरा यांच्या जीवनात आलेल्या या चिमुरडीला पाहून चाहत्यांनी या सेलिब्रिटी जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर तेव्हापासूनच मंदिरानं काही पोस्ट करत तिच्या मुलीलाही चाहत्यांच्या भेटीला आणलं. वीर आणि त्याही बहीण तारा, असं आपल्या दोन्ही मुलांचं नातं ती सुरेख पद्धतीनं सर्वांसमोर ठेवत आली. पण, याच मंदिरा बेदी हिचा संताप आता अनावर झाला आहे. तेसुद्धा याच सोशल मीडियामुळं.
मंदिरानं हल्लीच सोशल मीडियावर मुलांसमवेत खेळतानाच्या काही इंस्टा स्टोरी शेअर केल्या. ज्यावर काही नेटकऱ्यांनी मंदिराच्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्या. तुम्ही कोणत्या स्लमडॉग सेंटरमधून एक प्रॉप म्हणून या मुलीला दत्तक घेतलं असा प्रश्न एका युजरनं केलं. तर, दत्तक घेतलेल्या मुलीला किती वेगळं वाटत आहे, तुम्ही लालची, नशा करणारी लोकं झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना कायमच घाबरवत आहात, अशी कमेंटही एका युजरनं केली.
Video | गुलमर्गमध्ये रोप वेनं जाताना अमृता सिंहला भरली धडकी; पाहून सारा म्हणते....
नेटकऱ्यांच्या अशा कमेंट पाहून मंदिराचा संताप अनावर झाला. ज्यानंतर तिनं वाचाळपणे कमेंट करणाऱ्या या नेटकऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं. तिनं लिहिलं, 'अशा व्यक्तींवर खास लक्ष दिली जाण्याची गरज आहे. घ्या तुमच्याकडे मी लक्ष देत आहे....', तर दुसऱ्या युजरलाही तिनं चांगलंच खडसावत अशा प्रवृत्तीच्या लोकांवर निशाणा साधला.
View this post on Instagram
मंदिरा बेदीचा हा अंदाज पाहता, मुली किंवा आपल्या खासगी जीवनाबाबत मर्यादा सोडून बोलणाऱ्यांचा चकार शब्दही आपण खपवून घेणार नाही हेच तिनं स्पष्ट केलं आहे.