Namitha :'हिंदू असल्याचा पुरावा दे', भाजपवासी अभिनेत्रीला मिनाक्षी मंदिरात अनुभव; म्हणाली...
Namitha : मंदिरात हिंदू असल्याचा पुरावा मागितला असल्याचा दावा दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजप नेत्या यांनी केली आहे.
Namitha : आपल्याच देशात आपण भारतीय असल्याचा पुरावा अनेकांना द्यावा लागतोय. काहींना कामाच्या ठिकाणी तर काहींना सार्वजनिक ठिकाणी यावरून त्रास झाल्याच्या बातम्या रोजच येतात. आता देशातील मंदिरंही त्याला अपवाद ठरले नसल्याचं दिसून आलंय. दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजपच्या तामिळनाडूच्या राज्य कार्यकारिणीची सदस्या असलेल्या नमिता (Namitha) यांना हा अनुभव नुकताच आला. प्रसिद्ध मिनाक्षी मंदिरात (Meenakshi Temple) प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडून हिंदू असल्याचा पुरावा मागण्यात आल्याचा दाव नमिता यांनी केलाय.
नमिता यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्टही शेअर केली आहे. नमिता या भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्या देखील आहेत. त्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रिंगणात देखील उतरल्या होत्या. पण नुकतच त्यांनी मदुराईमधील मंदिरातील शेअर केलेला अनुभव सध्या चर्चेत आलाय. त्याचप्रमाणे त्यांना हिंदु असल्याचा पुरावा मागणाऱ्यांविरोधात त्यांनी कारवाई करण्याचीही मागणी केलीये.
नमिता यांची पोस्ट काय?
नमिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, आज पहिल्यांदाच माझ्याच देशात आणि माझ्याच स्वत:च्या ठिकाणी मला परकेपणाची भावना आली. कारण मला स्वत:ला हिंदू म्हणून सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली. मला हिंदू म्हणून विचारणा झाली हा मुद्दाच नाही, पण ज्याप्रकारे मला त्याबाबत विचारणा झाली ते अतिशय उद्धट आणि गर्विष्ठ अधिकारी आणि त्यांचा एक सहाय्यकही होते. मी विनंती करते की, संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी.
दरम्यान नमिता यांच्यासोबत 26 ऑगस्ट रोजी हा सगळा प्रकार घडला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, मी हिंदू म्हणून जन्माला आले. माझं लग्नही तिरुपती येथे झालं. माझ्या मुलाचं नवांही मी कृष्णाच्या नावावरुन ठेवलंय. पण तरीही माझी जात आणि श्रद्धा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा मागण्यात आला.
View this post on Instagram