VIDEO : हिंदीत बोला म्हणताच अभिनेत्री काजोल भडकली, पापाराझींना झापलं; म्हणाली...
Actress Kajol got angry : महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनेत्री काजोलचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, पापाराझींनी हिंदीत बोलण्यास सांगितल्यास ती भडकलेली पाहायला मिळाली.

Actress Kajol got angry : मुंबईतील (वरळी)एनएससीआय डोम येथे हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गझलकार भीमराम पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार (2025) प्रदान करण्यात आला. तर बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेते अनुपम खेर यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारासह 60 वा आणि 61 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरित करण्यात आले. यासोबतच ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा’ या नव्या पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी अभिनेत्री काजोलला पापाराझींनी हिंदी बोलण्यास सांगितल्यानंतर ती भडकलेली पाहायला मिळाली. नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊयात..
View this post on Instagram
आता मी पुन्हा हिंदीतून बोलू? ज्यांना समजायचे ते समजून घेतील - काजोल
अभिनेत्री काजोलला हिंदीतून प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिलेला पाहायला मिळाला. "आता मी पुन्हा हिंदीतून बोलू? ज्यांना समजायचे ते समजून घेतील" असं कालोज म्हणाली. पुढे बोलताना काजोलने सांगितलं की, माझ्या आईला हा पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळणे जास्त अभिमानाचे आहे. मला मराठी चित्रपटात काम करायला खूप आवडेल, चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्की काम करेन, असेही तिने सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काजोलचं कौतुक
दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री काजोलचे कौतुक देखील केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काजोल यांनी 30 वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित केलं. आजही त्या उत्तम प्रकारे सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारत आहेत. आज त्यांच्या जन्मदिवशी त्यांना पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होतो. तनुजाजी या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या, याचा आनंद आहे. त्या काळात एक मराठी मुलगी सिनेक्षेत्रात आपलं साम्राज्य प्रस्थापित करु शकते हे त्यांनी दाखवून दिलं होतं.. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























