Bollywood Suspense Thriller Movie: 169 मिनिटांची 23 वर्षांपूर्वीची सस्पेन्स थ्रिलर फिल्म, 'दृष्यम'ला लाजवणारा सस्पेन्स, ट्विस्ट पाहून लागेल 440 वॅटचा झटका
Bollywood Suspense Thriller Movie: 'दीवानगी' सिनेमा त्याच्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 11व्या सिनेमांपैकी एक बनला. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं खलनायक तरंग भारद्वाजची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली.

Bollywood Suspense Thriller Movie: काही सिनेमे (Bollywood Movies) असे असतात, जे आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडून जातात. अशाच एका सिनेमाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दीवानगी' सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला (Suspense Thriller Movie) नुकतीच 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक अनीस बज्मी (Anees Bazmee) यांनी हा सिनेमा त्यांच्या हृदयाच्या जवळ असल्याचं म्हटलेलं. दिग्दर्शकानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलेली आणि कॅप्शन दिलेलं. "दीवानगी' चित्रपटाची 23 वर्ष. हा चित्रपट नेहमीच माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहील. त्याने त्याच्या काळातील सस्पेन्स थ्रिलरला पुन्हा एकदा नव्याने आणले. या सुंदर प्रवासाबद्दल मी आभारी आहे...", असं कॅप्शन दिलंय. हा सिनेमा 25 ऑक्टोबर 2002 मध्ये प्रदर्शित झालेला. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलेलं. तर, नितीन मनमोहन यांनी निर्मिती केलेली.
'दीवानगी' सिनेमा त्याच्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 11व्या सिनेमांपैकी एक बनला. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं खलनायक तरंग भारद्वाजची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली. या भूमिकेसाठी अभिनेत्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळालेला. या चित्रपटात अजय देवगणसोबत अक्षय खन्ना आणि उर्मिला मातोंडकर यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या.
'दीवानगी' हा सस्पेन्स थ्रिलर एका सस्पेन्सफुल ड्रामावर आधारित आहे. अक्षय खन्ना राज गोयलची भूमिका साकारत आहे, जो एक प्रसिद्ध गुन्हेगारी वकील आहे, जो कधीही त्यानं हातात घेतलेली केस हरत नाही.
चित्रपटाची कथा नेमकी काय?
चित्रपटात अश्विन मेहता (विजयेंद्र घाटगे) प्रसिद्ध गायिका सरगमला (उर्मिला मातोंडकर) भेटतो. दुसऱ्या दिवशी, अश्विनची त्याच्या घरी निर्घृण हत्या केली जाते. सरगमचा बालपणीचा मित्र आणि संगीत गुरू तरंग (अजय देवगण) याला खुनी म्हणून अटक केली जाते. तरंग निर्दोष असल्याचा दावा करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारी गायिका सरगम राजला खटला लढण्यास सांगते.
तरंगला भेटल्यानंतर, राज त्याची केस लढवण्यास तयार होतो. कथेतील पुढील ट्वीस्ट प्रेक्षकांना हादरवून सोडतो. चित्रपटाचं संगीत इस्माईल दरबार यांनी दिलंय, तर गाणी सलीम बिजनूरी आणि नुसरत बद्र यांनी लिहिली आहेत. 'दीवानगी' अजूनही त्याच्या सस्पेन्स, उत्कृष्ट अभिनय आणि संगीतासाठी ओळखला जातो.


















