एक्स्प्लोर

Salman Khan On Rajpal Yadav: राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले

Salman Khan Reacts Strongly to Rajpal Yadav Controversy: 'तुम्हाला भरपूर काम मिळेल..' पुरस्कार सोहळ्यात अपमानित झालेल्या राजपाल यादवच्या समर्थनार्थ सलमान खान पुढे आला. तसेच कानही टोचले.

Salman Khan supports Rajpal Yadav: चमचमत्या कलाकारांच्या उपस्थितीत स्क्रीन अवॉर्ड्स 2026 हा शो अगदी दिमाखात पार पडला.  या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.  सध्या या शोमधील एक क्लिप सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की कार्यक्रमातील सूत्रसंचालक, अभिनेता राजपाल (Rajpal yadav) यादवला त्याच्या चेक बाऊन्स प्रकरणावरुन टोचून  बोलत आहे. हे ऐकून राजपाल यादव शांत होतो. या प्रकरणाची क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   नेटकऱ्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आता या घटनेवर सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राजपाल यादवला आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

राजपाल यादवच्या समर्थनार्थ सलमान खान (Salman Khan On Rajpal Yadav)

बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान राजपाल यादवच्या समर्थनार्थ  पुढे आला आहे.   सलमान खानने आपल्या एक्स अकाऊंटमध्ये या संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून सलमाननं  राजपाल पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कानही टोचले आहेत.  भाईजानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'भाऊ आपण या इंडस्ट्रीत 30 वर्षांपासून काम करत आहात.  सर्वांनी तुम्हाला पाहिलं आहे, संधी दिली आहे. कारण तुम्हाला तुमचे काम माहित आहे.  त्यातून तुम्ही एक मुल्य वाढवता.   तुम्हाला पुढे खूप काम मिळत राहिल. डॉलर रेटवर काम मिळत राहिल', असं सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 'आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा.. कधी  कधी काही गोष्टी फ्लोमध्ये होतात.   काही गोष्टी बोलल्या जातात. जर तुम्हाला काही द्यायचे असेल, तर ते लक्षात ठेवा आणि मनापासून काम करा. डॉलरचा भाव वाढो वा कमी होवो, त्याने काही फरक पडत नाही. शेवटी द्यायचं तर भारतातच आहे', असंही आपल्या पोस्टमध्ये सलमान खान म्हणाला आहे. सध्या सलमान खानच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्याचं कौतुक केलं आहे.

राजपाल यादवकडून  सलमान खानचे आभार (Rajpal Yadav On Salman Khan Post)

 

सलमान खानची पोस्ट शेअर करून राजपाल यादवने आभार व्यक्त केले आहेत. 'माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीची दखल घेतल्याबद्दल तुमचे खूप आभार. तुम्ही कायम मला मोठ्या भावाप्रमाणे वाट दाखवत आला आहात. लव्ह यू भाई...', असं म्हणत राजपाल यादव सलमान खानचे आभार व्यक्त करतो.

अवॉर्ड शोमध्ये राजपाल यादवसोबत नेमकं काय घडलं?

राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडीओत राजपाल एका इव्हेंटमध्ये म्हणतो, 'सध्या युद्ध सुरू आहे. नक्की काय, कुठे सुरुये....रुपये, डॉलर सगळं काही वर - खाली होत आहे.  काहीच कळत नाहीये...'  यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सौरभ द्विवेदी म्हणतो,  'राजपाल भाई डॉलर - रुपये कितीही वर - खाली झाले तरी, तुमचे  जितकी पैसे उधार बाकी आहेत, तितकेच तुम्हाला  परत करावे लागतील..' 

यानंतर राजपाल यादव हसतो आणि म्हणतो, 'मसला क्या है... ते तरी एकदा ऐका,.. ' यानंतर दोघांमध्ये सुरु असलेल्या चर्चेमध्ये जाकीर खान उडी घेतो, 'माझ्या मते हे प्रकरण आता न्यायालयात सुरू आहे. हे प्रकरण इथेच थांबवूयात', असं म्हणतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता राजपाल यादव काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या कचाट्यात सापडला होता. 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तो पुरता फसला होता. या कारणामुळे त्याला तिहाड जेलमध्येही जावं लागलं. या प्रकरणावरुन तो प्रचंड  चर्चेत आला होता. या प्रकरणाचा थेट परिणाम त्याच्या करिअरवरही झाला. दरम्यान, या प्रकरणानंतर सलमान खानने राजपालला आर्थिक तसेच वैयक्तिक मदत केली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मला इन्स्टाग्रामवर बऱ्याच गे लोकांचे मेसेज येतात...'; 'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget