एक्स्प्लोर

अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

महापालिकेच्या क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी दिली.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते प्रशांत दामले (Prashant Damle) यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने आता मुंबई महापालिकेच्या कला विषयक कारभारात त्यांचा थेट सहभाग असणार आहे. मुंबईच्या (Mumbai) महापौर रितू तावडे यांच्या हस्ते आज (10 जुलै) रोजी त्यांना विश्वस्तपदी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यामुळे, प्रशांत दामले यांच्याकडे मुंबईच्या कला-क्रीडा प्रतिष्ठानची धुरा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. दामले यांच्या कला क्षेत्रातील अनुभवाचा प्रतिष्ठानच्या कला व क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना मोठा फायदा होईल, असा विश्वास महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी दिली. 36 नाटकांमधील 13,538 हून अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम दामले यांच्या नावावर असून त्यांच्या कामगिरीची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 4 वेळा नोंद झाली आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील प्रशांत दामले सन्मानित आहेत. सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. 

प्रशांत दामले यांचा संक्षिप्त परिचय

शाळकरी वयातील गाण्यापासून जागतिक विक्रमांपर्यंतचा प्रवास मूळचे मुंबईकर असलेल्या प्रशांत दामले यांना शालेय जीवनापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यात अभिनयाची आणि नाटकांची आवड निर्माण झाली. त्यांनी 1978 ते 1983 या काळात समांतर रंगभूमीवर काम करून आपल्या अभिनयाचा पाया मजबूत केला. 1983 मध्ये आलेल्या ‘टूरटूर’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाने त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. त्यानंतर दामले यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी तब्बल 36 विविध नाटकांमधून 13,538 पेक्षा अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेत 4 लिमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये त्यांचे नाव कोरले गेले आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि सन्मान

प्रशांत दामले यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर एक उत्तम गायक, सूत्रसंचालक आणि निर्माता म्हणूनही आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना केंद्र शासनाचा मानाचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. मागील तीन वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते धुरा सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असतात.

नवी जबाबदारी आणि विश्वास

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची धुरा आता श्री. प्रशांत दामले यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय कलावंताकडे सोपवण्यात आली आहे. दामले यांच्या या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस निश्चित होईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा महापौर रितू तावडे यांच्यासह उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Spruha Joshi Poem: 'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
'मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले, हे तर नुसते देशद्रोही..' जंतर-मंतर पार्श्वभूमीवर स्पृहा जोशीची कविता चर्चेत 
Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप
Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget