'मुलगी जन्माला आली की..', जितेंद्र जोशीची लेकीसाठी भावूक पोस्ट
Actor Jitendra Joshi emotional post : अभिनेता जितेंद्र जोशी याने त्याच्या मुलीबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Actor Jitendra Joshi emotional post : अभिनेता जितेंद्र जोशी सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो सिनेमाचं प्रमोशन करत असतो. शिवाय जितेंद्र जोशी आपले विचार देखील सोशल मीडियावरुन व्यक्त करताना पाहायला मिळतो. दरम्यान, आता जितेंद्र जोशी याने सोशल मीडियावर त्याच्या मुलीबाबत एका भावूक पोस्ट शेअर केली आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या पोस्टमध्ये काय काय म्हटलंय? जाणून घेऊयात..
जितेंद्र जोशीची पोस्ट जशीच्या तशी
पहिल्या चित्रफिती मध्ये ईच्छा आणि शेवटच्या छायाचित्रात वास्तव आहे ; दोन्हींच्या मध्ये काळ !! एकेका क्षणाचा दिवस, दिवसाचा आठवडा, महिना , वर्ष बनून/ बदलून सरताना मनात मात्र काही क्षण रेंगाळत राहतात. मुलगी जन्माला आली की नवा श्वास मिळतो, छातीचा भाता आणखी मोठ्ठा.. होतो!! स्वप्नात सुद्धा वाटणार नाही अशा गोष्टी आयुष्यात घडतात. काम, पुरस्कार, मान प्रतिष्ठा सगळं एकीकडे आणि एका मुलीचा बाप होणं एकीकडे.
पालक होण्याचं सुख आपल्याला मुलंच देतात. आपल्यालाही ते घेता आलं पाहिजे. मुलांच्या वया इतकंच पालकांचं वय असतं हे आपणसुद्धा ओळखलं पाहिजे . मुलं पालकांना जबाबदारी शिकवतात. नवीन विचार देतात. मुलांचा वाढदिवस म्हणजे पालकांचा ही जन्मदिवस. मुलं वाढतातच पण पालक सुद्धा मोठी होतात (शहाणी झाली तर उत्तमच!!)
मोठी होऊ नकोस, तशीच रहा वगैरे नको बालिशपणा! त्यापेक्षा मस्त जे वाटेल जो वाट्टेल तो रस्ता मुलांना धरू द्यावा आणि जमलंच तर साथ द्यावी. 15 वर्ष अशी बघता बघता निघून गेली . पुढची सुद्धा जातील. जन्मदिन चिरायू होवो. Happy birthday!!
जितेंद्र जोशीच्या दुनियादारी सिनेमाला 12 वर्ष पूर्ण
जितेंद्र जोशीने दुनियादारी या सिनेमात नेगेटिव्ह भूमिका साकारली होती. दुनियादारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. दरम्यान दुनियादारी चित्रपट येऊन 12 वर्षे उलटले. या निमित्ताने जितेंद्र जोशी याने एक पोस्ट शेअर आठवणींना उजाळा दिला होता.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
सौंदर्य असं की वयाच्या 17 वर्षी स्टार झाली, नॅशनल अवार्ड जिंकला, पण एका आरोपाने करियर संपवलं























