एक्स्प्लोर

Devdatta Nage Ghabadkund Look: डोळ्यांत अंगार अन् चेहऱ्यावर रहस्यमयी भाव; 'खंडोबा' साकारणाऱ्या देवदत्त नागेच्या नव्या लूकनं वाढवली उत्सुकता PHOTO

Devdatta Nage Ghabadkund Look: आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा 'घबाडकुंड' या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. 

Devdatta Nage Ghabadkund Look: हिंदी (Hindi Movie) आणि तेलुगू सिनेविश्वात (Telugu Films) आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे (Actor Devdatta Nage) आता मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) दमदार पदार्पण करत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा एकदा नव्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा 'घबाडकुंड' (Ghabadkund Movie) या आगामी चित्रपटातील (Upcoming Marathi Cinema) लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. 

आतापर्यंत 'आदिपुरुष'मधील हनुमंत, 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'मधील सूर्याजी मालुसरे, 'सत्यमेव जयते'मधील इन्स्पेक्टर शंकर गायकवाड, तसेच 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' मधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि तेलगू चित्रपट 'कमसराजू' मधील 'देवकी नंदन वासुदेवा'सारख्या विविध व्यक्तिरेखांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद प्रभावीपणे सिद्ध केली आहे. प्रत्येक भूमिकेत नवं काहीतरी सादर करत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली आहे. आता मात्र देवदत्त एका पूर्णपणे नव्या आणि अनपेक्षित अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)

'घबाडकुंड' या आगामी चित्रपटामधील 'खंग्री' या त्यांच्या भूमिकेचा रांगडेपणा तीव्र आणि गूढ लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तीक्ष्ण नजर आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्यांच्या या व्यक्तिरेखेभोवती रहस्यमय आकर्षण निर्माण झालं आहे.

या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेला बदल, त्यासाठी घेतलेली मेहनत यांतून त्यांचा हा लूक अधिक प्रभावी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. काहीतरी वेगळं सादर करण्याची देवदत्त नागे यांची खासियत या नव्या अवतारातूनही ठळकपणे दिसून येत आहे.

प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असून, देवदत्त नागे यांच्या या दमदार लूकमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

'घबाडकुंड'मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. कल्पनेच्या पलीकडचं 'युनिव्हर्स' मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या चित्रपटासाठी लाभली आहे. 'आयकॉन दी स्टाईल' या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स 'घबाडकुंड' येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मराठीत पहिल्यांदाच अनुभवा ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; हॉरर सिनेमा ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
Bollywood Actor Post On Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget