Dhurandhar: धुरंधरमधील रहमान डकैतची भूमिका साकारण्यास 3 कलाकारांचा नकार, Casting Director म्हणाला..
Akshay Khanna Comeback from Dhurandhar: रहमान डकैतची भूमिका आधी अनेक कलाकारांनी नाकारली होती.

Casting Director On Akshay Khanna Role in Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'मध्ये (Dhurandhar) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अक्षय खन्नाची (Akshay Khanna) भूमिका प्रचंड गाजली. अक्षय खन्नानं रहमान डकैतची भूमिका साकारली होती. त्यानं आपल्या अभिनयातून जबरदस्त कमबॅक केला. त्याच्या चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं. अक्षय खन्नाचा अभिनय, डायलॉग डिलिव्हरी, डान्स मूव्ह्ज आणि अॅक्शनमुळे चित्रपट अधिक रंगतदार बनला. दरम्यान, पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्नाने साकारलेलं पात्र रहमान डकैतचा (Rehman Dakait) मृ्त्यू होतो. त्यामुळे त्याचा दुसऱ्या पार्टमध्ये कोणताही रोल नव्हता. 'धुरंधर 2' मध्ये अक्षय खन्नाची भूमिका नसल्यामुळे चाहते तसेच प्रेक्षक काही प्रमाणात नाराज झाले होते. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक आहे का? अक्षय खन्नाला रहमान डकैत ही भूमिका ऑफर करण्यापूर्वी, ही भूमिका इतर 3 कलाकारांना ऑफर करण्यात आली होती. मात्र, अनेक कलाकारांनी हा रोल रिजेक्ट केला होता. अलिकडेच 'धुरंधर 2'चे कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाबराने खुलासा केला आहे.
'धुरंधर 2'ने भलेभले रेकॉर्ड्स मोडले (Dhurandhar Casting Director)
'धुरंधर 2' सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 1000 कोटींचा टप्पा पार केला. दरम्यान, एका मुलाखतीत, कास्टिंग डायरेक्टरने स्पाय थ्रिलर चित्रपटाच्या कास्टिंग प्रोसेसबाबत माहिती दिली. त्याने खुलासा केला की, रहमान डकैत हे पात्र साकारण्यासाठी अनेक कलाकारांनी नकार दिला होता. दरम्यान, अक्षय खन्नाने हा रोल स्वीकारला. या खास पात्रामुळे त्याचा सिनेइंडस्ट्रीत पुन्हा एकदा जोरदार कमबॅक झालाय. मुकेश छाबराने मुलाखतीत 'धुरंधर' आणि रहमान डकैत या पात्राविषयी अनेक खुलासे केले आहे.
400 कलाकारांची कास्टिंग करण्यात आली (Dhurandhar Film Casting Actors)
मुकेश छाबरा म्हणाला, 'मला 4 तास या चित्रपटाची स्टोरी सांगण्यात आली होती. यानंतर मी शॉक झालो. जरी मी अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग केले असले तरी, सुरुवातीला मला भीती वाटत होती. ही एक मोठी फिल्म असल्याकारणाने, मला नवोदित कलाकारांना संधी द्यायची होती', असं मुकेश म्हणाला. 'जर दोन्ही चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास तर या चित्रपटासाठी 400 कलाकारांची कास्टिंग करण्यात आली होती. मी यासाठी 6 लोकांची टीम तयार केली होती. तसेच शोधाशोध सुरु केली होती', असंही मुकेश म्हणाला.
'यासाठी मला आदित्यने पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. आम्हाला ठाऊक होते की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल', असा विश्वास मुकेशने व्यक्त केला. रहमान डकैत या पात्राबाबत मुकेश म्हणाला, 'मी कुणाचा नाव घेणार नाही. पण 2-3 कलाकारांनी रहमान डकैत हे पात्र साकारण्यास नकार दिला होता. मला खात्री आहे की त्या कलाकारांना आता पश्चाताप होत असेल', असंही मुकेश म्हणाला.
'धुरंधर'साठी रणवीरचा आधीच होकार (Ranveer Singh On Dhurandhar)
'धुरंधर' या चित्रपटात काम करण्यासाठी सुरुवातीला रणवीर सिंहने आधी होकार दिला होता. कास्टिंग डायरेक्टरने सांगितले की, 'कास्टिंग या प्रोसेस दरम्यान, अनेक कलाकारांनी या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता. तेव्हा आदित्यने दुसऱ्या कलाकारांचा शोध घ्या, असं सांगितलं. रिसर्च आणि कलाकारांची निवड करण्यात आमचे साधारण 2 वर्षे निघून गेले. 2024च्या सुरुवातीला आम्ही या प्रोजेक्टवर काम करु लागलो. सुरुवातीलाच आमचं क्लिअर होतं की, रणवीरलाच हमजा हे पात्र साकारण्यास देण्यात यावे. त्यानं ही व्यक्तीरेखा उत्तमरित्या साकारलीये', असं कास्टिंग डायरेक्टर म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















