एक्स्प्लोर

Abhishek Bachchan: 'बिग बीं 'च्या लेकानं केली जबरदस्त डील; साऊथ मुंबईतील आलिशान फ्लॅट विकला, किती कोटी कमावले ?

अनेकदा सेलिब्रेटी गुंतवणुकीसाठी एखादी मालमत्ता विकत घेतात. सध्या या भागातील अपार्टमेंटच्या प्रचंड वाढलेल्या किमती पाहता अभिषेकला प्रचंड नफा झाल्याचे बोललं जात आहे. 

Abhishek Bachchan: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कारणामुळे चर्चेत असतो. कधी चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे त्याची चर्चा असते. पण सध्या अभिषेक बच्चन त्याच्या व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने मुंबईतील त्याचं अपार्टमेंट विकलं आहे. साउथ मुंबईमधील उच्चभ्रू आणि प्रीमियम रियल इस्टेट मानल्या जाणाऱ्या महालक्ष्मी या भागात असणारा सी -फेसिंग फ्लॅट अभिषेकने विकला आहे. तब्बल 14.5 कोटी रुपयांना त्याने हा लक्झरी फ्लॅट विकल्याचे बोललं जात आहे. त्याच्या हाय प्रोफाईल विक्रीमुळे सध्या सोशल मीडियावरही त्याची एकच चर्चा रंगली आहे. अनेकदा सेलिब्रेटी गुंतवणुकीसाठी एखादी मालमत्ता विकत घेतात. सध्या या भागातील अपार्टमेंटच्या प्रचंड वाढलेल्या किमती पाहता अभिषेकला प्रचंड नफा झाल्याचे बोललं जात आहे. 

कोणी विकत घेतला अभिषेकचं अपार्टमेंट?

दक्षिण मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू मानला जाणाऱ्या महालक्ष्मी येथे आलिशान अपार्टमेंट अभिषेक बच्चनने विकला आहे. त्याच्या अपार्टमेंट 64,473 प्रति चौरस फूट या दराने विकले गेल्याचे सांगितलं जात आहे. महालक्ष्मी येथील आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट 14.5 कोटी रुपयांना विकले गेले आहे. या अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ 2249 चौरस फूट होते. हे अपार्टमेंट बेन कॅपिटल प्रायव्हेट इक्विटीचे भागीदार ऋषी मांडवत आणि स्मिता मेहता यांनी विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

महालक्ष्मी येथे असलेला गोदरेज प्लॅनेट हा मुंबईतील सर्वात प्रीमियम निवासी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. पाच टॉवरच्या या मोठ्या इमारतीच्या प्रकल्पात दोन तीन आणि पाच बीएचके अपार्टमेंट्स आहेत. जवळपास 300 हून अधिक घरे या टॉवरमध्ये आहेत. याच टॉवर मधील एक अपार्टमेंट अभिषेक बच्चनचे होते. दरम्यान अभिषेक बच्चन कडून या विक्री बाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या व्यवहाराचे अधिकृत नोंदणी 12 फेब्रुवारी 2026 ला झाल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार कळतंय. 

अभिषेकची रिअल इस्टेट गुंतवणूक 

अभिषेक बच्चन सध्या रियल इस्टेटमध्ये प्रचंड गुंतवणूक करत असल्याचे बोललं जातंय. त्याने बोरवली येथील ओबेरॉईस काय सिटी येथे सहा अपार्टमेंट  खरेदी केले होते. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळून ही मालमत्ता त्याने खरेदी केली आहे. तसेच गिफ्ट सिटी गुजरात येथेही उद्योजक आनंद पंडित यांच्यासोबत मिळून त्याने एक रियल इस्टेट प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. 

कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, अभिषेक बच्चन हा 2025 मध्ये हाउसफुल 5 मध्ये दिसला होता. तरुण मनसुखाने दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, सोनम बाजवान, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह इतर कलाकारांनी ही भूमिका साकारल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
Rajkumar Rao on CJP Protest: 'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
Prashant Damle On CJP Protest: 'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत
'आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..' अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत
Shahrukh Khan on CJP: सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Embed widget