एक्स्प्लोर

Abhijeet Bichukale : EVM विरोधातील लढ्यात अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री, म्हणाले, हजार लोकांनी सेल्फी काढले,200 मतं तरी...

Abhijit Bichukale : विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाला असल्याची शंकी अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केली आहे.

Abhijeet Bichukale : राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Elections 2024) महायुतीच्या बाजूने बहुमत झुकलं आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा दावा वारंवार मविआच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळे सध्या विधानसभा निवडणुकांचा ऱणसंग्राम संपला असला तरीही आरोपांची खेळी अजूनही सुरुच आहे. विरोधकांनी ईव्हीएमविरोधात लढा उभा केल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. याच लढ्यात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची एन्ट्री झाली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी जर शरद पवारांनी (Sharad Pawar) ईव्हीएम विरोधात लढा उभा केला तर माझा त्यांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. 

अभिजीत बिचुकले हे यंदाची विधानसभा बारामती विधानसभा मतदारसंघातून लढत होते. बारामतीची यंदाची लढाई हा राज्यातील सर्वात लक्षवेधी आणि चुरशीची लढत होती. कारण अजित पवार विरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार अशी ही लढत झाली होती. याच मतदारसंघातून अभिजीत बिचुकले देखल निवडणूक लढवत होते. पण आता निकालानंतर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया देत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याची शंका व्यक्त केली आहे.

मला 200 मतं तरी पडायला हवी होती - अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात मला खूप स्टारडम आहे. मी कुठेही दिसलो तरी शंभर लोकं माझ्या आजूबाजूला फोटो काढण्यासाठी जमा होतात. बारामतीत निवडणुकीवेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे बॅच आणि उपरणे बाजूला ठेवून माझ्यासोबत फोटो काढत होते. किमान हजार माणसांनी तरी माझ्यासोबत फोटो काढलेत. त्यामुळे मला कमीत कमी 200 मतं तरी पडायला हवी होती. पण ती पडली नाहीत, म्हणजेच ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. जर शरद पवार ईव्हीएमविरोधात लढा उभारणार असतील तर त्यांच्यासोबत मी असेन...

विरोधकांना शंभर जागा मिळणं तरी अपेक्षित आहे - अभिजीत बिचुकले

शरद पवारांविषयी बोलताना अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की,  शरद पवारांचे वय पाहता, त्यांचा दारुण पराभव जरी झाला असेल, तरी एवढा दारुण पराभव व्हावा,असं मला बारामतीमधला एक विरोधक म्हणूनही वाटत नाही. त्यांचं कार्य मोठं आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. विरोधकांना किमान 100 जागा मिळणं तरी अपेक्षित होतं. पण आता जर शरद पवार 'ईव्हीएम'बाबत बोलत असतील, तर ते गंभीर आहे.

ही बातमी वाचा : 

Manjiri Oak : हा तुझा पहिला सिनेमा असू शकतो? तू खोटं बोलतोयस, आदिनाथ कोठारेच्या 'पाणी' सिनेमासाठी मंजिरी ओकची खास पोस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anandi Serial: ‘आनंदी’मध्ये येणार खलनायकी ट्विस्ट! या लोकप्रिय अभिनेत्याचा उर्मट आणि अय्याश अवतार पाहून प्रेक्षकही थक्क
‘आनंदी’मध्ये येणार खलनायकी ट्विस्ट! या लोकप्रिय अभिनेत्याचा उर्मट आणि अय्याश अवतार पाहून प्रेक्षकही थक्क
दिल आया 'कैदी' पे तो.. तुरुंग अधिकारी महिलेची फिल्मी लव्हस्टोरी; जन्मठेपेतील कैद्याशी लग्न, धर्माच्या भींतीही तोडल्या
दिल आया 'कैदी' पे तो.. तुरुंग अधिकारी महिलेची फिल्मी लव्हस्टोरी; जन्मठेपेतील कैद्याशी लग्न, धर्माच्या भींतीही तोडल्या
Jai Jai Swami Samarth:  स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा अहंकार होणार चक्काचूर! 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवा ट्वीस्ट
 स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा अहंकार होणार चक्काचूर! 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवा ट्वीस्ट
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget