एक्स्प्लोर

Abhijeet Bichukale : 'माझ्याशिवाय मराठी बिग बॉस चालणारच नाही, पाचव्या सिझनमध्ये एन्ट्री फिक्स'; अभिजीत बिचुकलेंना 1लाख टक्के आत्मविश्वास 

Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता ते पाचव्या सिझनमध्येही सहभागी होणार असल्याचं त्यांनी निश्चित केलंय. 

Abhijeet Bichukale : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi new season) घर हे आतापर्यंत अनेक सदस्यांनी गाजवलं. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा सिझन प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. आता पाचव्या सिझनमध्येही घरातले राडे, भांडणं या सगळ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त होत असतात. त्यातच आता पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

पाचव्या सिझनच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी आता अभिजीत बिचुकलेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झालीये.  त्यातच त्यांनी नुकतीच रेडीओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्यही केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याशिवाय बिग बॉस मराठी चालणारच नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

'माझ्याशिवाय बिग बॉस मराठी चालणार नाही'

अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की, 'बिग बॉसचा पहिला सिझन कुणालाही माहिती नव्हता. म्हणूनच बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये मला नेलं. आजही 3,4 आता 5 सिझन झाले पण अभिजीत बिचुकलेशिवाय बिग बॉस मराठी चालणार नाही.'  आता वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक म्हणून घरात तुमची एन्ट्री होणार का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं की, 'पाचव्या सिझनमध्येही मला एकलाख टक्के बोलवणार.'

अभिजीत बिचुकलेचं नाव चर्चेत

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये अभिजीत बिचुकले हे एकमेव राजकीय नेते होते. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होता. बिग बॉस मराठीमुळे अभिजीत बिचुकलेची महाराष्ट्राचा चांगलीच ओळख झाली होती. त्यानंतर हिंदी बिग बॉसमुळे बिचुकलेला देशात ओळख मिळाली. आता त्याची बिग बॉस मराठीत पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बिग बॉस मराठीत राखी सावंतला वाईल्ड कार्डचं तिकीट?

'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्याच दिवसापासून आरडाओरड आणि आक्रमक भूमिकेने निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) सगळ्यांचेच लक्ष वेधलं आहे. निक्की तांबोळीने पहिल्या दिवसापासून वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) यांच्यासोबत वाद घातला. त्यासोबत ती घरातील इतर सदस्यांसोबतही भांडताना दिसत आहे. 'भाऊचा धक्का'मध्येही रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) निक्कीला यावरून वारंवार झापलं आहे. निक्कीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे निक्कीला अद्दल घडवण्यासाठी नेटकऱ्यांनी थेट राखी सावंतला (Rakhi Sawant) वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्याची मागणी केली आहे.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 :  'बुद्धीही हलकीच, निक्की तुम्ही चावीचं माकड', भाऊच्या धक्क्यावर सलग चौथ्या आठवड्यात निक्कीचा करेक्ट कार्यक्रम 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बायकोचं निधन, आर्थिक अडचण अन् स्वत:ला संपवण्याचा विचार; नैराश्याला झटकत मराठी अभिनेता नव्या नाटकातून परततोय
बायकोचं निधन, आर्थिक अडचण अन् स्वत:ला संपवण्याचा विचार; नैराश्याला झटकत मराठी अभिनेता नव्या नाटकातून परततोय
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
इस्त्रायल- इराणच्या युद्धजन्य स्थितीच्या कचाट्यात सापडली मलायका अरोराची आई, घाबरत म्हणाल्या; 'डोळ्यांसमोर क्षेपणास्त्र अन्...
इस्त्रायल- इराणच्या युद्धजन्य स्थितीच्या कचाट्यात सापडली मलायका अरोराची आई, घाबरत म्हणाल्या; 'डोळ्यांसमोर क्षेपणास्त्र अन्...
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget