
Por Beautiful : रशियन अभिनेत्यासोबत जमली आयुषी टिळकची जोडी, ‘पोर ब्युटीफुल’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Por Beautiful : अभिनेता सुयश टिळकची (Suyash Tilak) पत्नी अभिनेत्री आयुषी टिळक (Aaysuhi Tilak) पहिल्यांदाच ‘पोर ब्युटिफुल’ (Por Beautiful ) या म्युझिक व्हिडीओमधून आपल्या भेटीस आली आहे.

Por Beautiful : अभिनेता सुयश टिळकची (Suyash Tilak) पत्नी अभिनेत्री आयुषी टिळक (Aaysuhi Tilak) पहिल्यांदाच ‘पोर ब्युटिफुल’ (Por Beautiful ) या म्युझिक व्हिडीओमधून आपल्या भेटीस आली आहे. ‘दादला बुलेवाला’ या गाण्याला मिळालेल्या यशानंतर सिग्नेचर ट्युन्सनं एबी एंटरटेन्मेंटच्या सहकार्यानं निर्मिती केलेल्या या म्युझिक व्हिडीओमध्ये स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेताही पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये चमकत आहे.
‘पोर ब्युटिफुल’ हा म्युझिक व्हिडीओ युट्यूबद्वारे लाँच करण्यात येणार आहे. श्रेयश राज आंगणे यांनी या म्युझिक व्हिडीओचं गीत लेखन, गायन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर अमित बाईंग यांनी नृत्य दिग्दर्शन आणि म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे.
पाहा गाणे :
‘तुला बघून म्हणतोय आईना, पोर ब्युटिफुल हाय ना...’ असे हलकेफुलके शब्द आणि उडती चाल यामुळे हे गाणं नक्कीच संगीतप्रेमींना आवडेल. या गाण्याचं छायांकन हरेश सावंत यांनी सांभाळले असून, अन्य तांत्रिक बाजूही उत्तम असल्यानं गाणं प्रेक्षणीय झालं आहे. वसईच्या निसर्गरम्य परिसरात या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.
मराठी गाण्यात दिसणार रशियन अभिनेता!
स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. आतापर्यंत अनेक परदेशी कलाकार म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले असले, तरी रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. त्यामुळे ही देखणी ‘पोर ब्युटिफुल’ प्रेक्षकांची पसंती मिळवणारी ठरेल यात शंका नाही.
सुयश-आयुषीची जोडी
गेल्या वर्षी अभिनेता सुयश टिळक याने आयुषी भावे हिच्याशी विवाह केला. अभिनेत्री आयुषी भावे एक प्रसिद्ध अभिनेत्री असून, ती उत्तम डान्सरही आहे. ती लवकरच चित्रपटांमध्ये झळकणार आहे. आयुषी हिने 2018 मध्ये ‘श्रावण क्वीन’चा किताब मिळवला होता. याच बरोबर ती ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमध्ये देखील झळकली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी मराठी चित्रपटातही दिसणार आहे. ‘या गावचं की त्या गावचं’ या चित्रपटात ती दिसणार आहे. आयुषी भावे ही एक उत्तम डान्सर असल्याने तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. ‘बरखा’ या व्हिडीओ गाण्यातून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेता सुयश टिळक याने अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. तो टीव्ही मालिकांमुळेही लोकप्रिय आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
