एक्स्प्लोर

Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'

Aamir Khan Gauri Spratt Wedding: आमिर खाननं गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केल्यानंतर आता त्याच्यावर लव्ह जिहादचे आरोप केले जात आहेत. त्यावर त्यानं मौन सोडलं असून सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Aamir Khan Gauri Spratt Wedding: बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mr. Perfectionist) म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Actor Aamir Khan) सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे (Aamir Khan Third Wedding) भलताच चर्चेत आहे. साठी ओलांडलेल्या आमिर खाननं (Aamir Khan) नुकतंच तिसरं लग्न केलंय. त्यानं त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्यासोबत आपल्या आयुष्याची तिसरी लग्नगाठ बांधली. यापूर्वी आमिर खाननं दोन लग्न केलेली आणि त्याचे दोन्ही संसार मोडलेत. त्याला आधीच्या लग्नांपासून तीन मुलं आहेत. सध्या आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरुन राजकीय मंडळींकडून लव्ह जिहादचे आरोप केले जात आहे. मंत्री नितेश राणेंनी तर आमिर खानला लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसिडर असं म्हटलं आहे. तसेच, बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनांनी त्याच्यावर 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) आरोप केला आहे. इतकंच काय तर, आमिर खानविरोधात फतवादेखील जारी करण्यात आला आहे. अशातच, तिसऱ्या लग्नावरुन मोठा गदारोळ होताच, आता आमिर खाननं त्याच्यावर आणि गौरीवर होणाऱ्या सततच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. 

लव्ह जिहादच्या आरोपांवर आमिर खानचं सडेतोड प्रत्युत्तर (Aamir Khan On Love Jihad Allegation)

आपल्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगला उत्तर देताना आमिर खाननं 'डेक्कन क्रॉनिकल'शी बोलताना आपलं मत मांडलंय. तसेच, टीकेची झोड उठवणाऱ्यांना त्यानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. आमिर खान म्हणाला की, त्याचं कुटुंब अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक विचारांचं आहे. त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न हिंदू पुरुषांशी झाली आहेत आणि त्याच्या मुलीनंही एका हिंदू व्यक्तीशीच लग्न केलंय. त्याचा चुलतभाऊ मन्सूर यानं एका ख्रिश्चन महिलेशी लग्न केलंय. गौरी, रीना आणि किरण यांनी त्याच्याशी लग्न करताना आपला धर्म बदलला नाही, कारण हे विवाह कायदेशीर नोंदणी पद्धतीनं (सिव्हिल सेरेमनी) पार पडलेले. मुळात गौरी हिंदू नाहीच, ती ख्रिश्चन आहे. आमिर खाननं पुढे सांगितलं की, गौरी ख्रिश्चन असली तरी ती धार्मिक विधींचं काटेकोरपणे पालन करत नाही. 

आमिर खाननं यावेळी बोलताना मुंबईतील वांद्रे इथल्या पाली हिलमध्ये 100 कोटी रुपयांच्या 'मल्टी-जेनरेशनल स्कायविला'च्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिलंय. त्यानं सांगितलं की, मुंबईतील इतर अनेक इमारतींप्रमाणेच त्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचाही पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) केला जातोय. हा निर्णय त्यांच्या हाऊसिंग सोसायटीनं घेतला आहे, ज्यामध्ये स्वतः आमिर खानसह एकूण 24 सदस्यांचा समावेश आहे. या गटात एका बिल्डरचाही समावेश आहे. मोठ्या संख्येनं फ्लॅट्स खरेदी केल्यामुळे इमारतीचा बराचसा भाग त्या बिल्डरच्या मालकीचा आहे.

दरम्यान, आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्याशी झालं होतं. त्यांना जुनैद (मुलगा) आणि इरा खान (मुलगी) ही दोन मुलं आहेत. त्याचं दुसरं लग्न किरण राव यांच्याशी झालं होतं आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. 5 जुलै रोजी आमिर खाननं कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिसरं लग्न केलंय. आमिरची तिसरी बायको गौरी स्प्रॅट ही एक व्यावसायिक आहे. गौरीचंही हे दुसरं लग्न आहे. तिला तिच्या आधीच्या लग्नापासून सात वर्षांचा मुलगा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: अनिल कपूर यांच्या फिल्मची स्क्रिप्ट चोरुन बनवलाय हॉलिवूडचा 'हा' ऑस्कर विनिंग सिनेमा; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget