Ankit Mohan : मालिका, चित्रपटांनंतर अंकित मोहन करणार रॅप साँगमधून प्रेक्षकांवर जादू!
New Rap Song : 'क्रेझी क्रेझी क्रेझी' असे या रॅप साँगचे बोल असून, या गाण्यात अंकित मुख्य भूमिकेत दिसत आहे. या रॅप साँगमधून अंकितने क्रेझी अॅप नेमकं काय आहे, हे सांगितले आहे.
Ankit Mohan New Song : अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) आजवर मालिका चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला. त्याने हिंदी आणि मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता मात्र अंकित एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, नुकत्याच सुरु झालेल्या क्रेझी अॅपच्या गाण्यात अंकित पाहायला मिळणार आहे. 'क्रेझी क्रेझी क्रेझी' असे या रॅप साँगचे बोल असून, या गाण्यात अंकित मुख्य भूमिकेत दिसत आहे. या रॅप साँगमधून अंकितने क्रेझी अॅप नेमकं काय आहे, हे सांगितले आहे. या गाण्यात अंकितचा एनर्जेटिक अंदाज पाहायला मिळाला आहे.
अंकितने गाण्यातून केलेल्या या क्रेझी अॅपच्या प्रशंसेबाबत बोलायचे झाले, तर या अॅपमध्ये क्रिएटर, कलाकार यांच्या जोडीला ऑडियन्सलाही संधी मिळणार आहे. भाषेचे बंधन नसणाऱ्या या क्रेझी अॅपमधून एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. अंकितने या गाण्यातून कलाकागुणांना प्लॅटफॉर्म मिळाला आहे, तर त्याचा योग्य तो उपयोग करा हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या क्रेझी रॅप साँगची निर्मिती देवभाई खेतभाई भतेसार, ओमकार विलास दळवी, सुरेंद्र राजेंद्र कुडतडकर यांनी केली असून, दिग्दर्शक अमोल जाधव यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. या गाण्याचे क्रिएटिव्ह हेड आणि 'क्रेझी अॅप'चे फाउंडर म्हणून संकेत सूर्यकांत शिंत्रे यांनी बाजू सांभाळली आहे. तर, या गाण्याला सुरेश विश्वकर्मा यांनी आपली कॅमेऱ्यात कैद केले आहे. या गाण्याचे बोल आर. विशाल लिखित असून, त्यानेच या गाण्याच्या संगीताची बाजू सांभाळली आणि गाणे देखील गायले आहे. हे गाणे कोरियोग्राफर संदेश वसंत नेवरेकर याने कोरियोग्राफ केले आहे.
या गाण्याचे क्रिएटिव्ह हेड आणि 'क्रेझी अॅप'चे फाउंडर संकेत शिंत्रे गाण्याबद्दल सांगताना असे म्हणतात की, ‘हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्याचे खास कारण म्हणजे नव्या प्लॅटफॉर्मची जनजागृती होय. अंकितने या गाण्यात उत्तम बाजू सांभाळली आहे. अंगी दडलेल्या गुणांना योग्य असा प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम हे अॅप करणार आहे. एका अॅपचे गाणे बनवणे हा देखील नवा टास्क माझ्या समोर होता, मात्र संपूर्ण टीमच्या साहाय्याने आम्ही हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलो आहोत.’
हेही वाचा :
- Nia Sharma : 'पैशांसाठी कराव्या लागतात विणवण्या'; नियानं सांगितला स्ट्रगलचा अनुभव
- Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर का दिसते स्लिम ट्रिम? जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha