OTT वर 5 नव्या धमाकेदार फिल्म्स, सीरिज रिलीज; अॅक्शन, सस्पेन्स, थ्रील अन् कॉमेडीचा डबल डोस, 2024 च्या ब्लॉकबस्टर मूव्हीचाही समावेश
New OTT Releases: OTT प्लॅटफॉर्मवर 5 चित्रपट, सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. याचा आनंद तुम्ही घरी बसून घेऊ शकता. या यादीत 'जिगरा', 'विकी विद्याचा तो व्हिडीओ' यांचा समावेश आहे. 2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट देखील आता OTT वर पाहता येईल.
5 New OTT Releases: OTT एंटरटेनमेंटचा नवा अड्डा बनला आहे... आधी थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट पाहावे लागायचे आणि वेळेअभावी थिएटरमध्ये जायला मिळालं नाहीतर, मग झालंच... तो चित्रपट कधी एकदा एखाद्या चॅनलवर दाखवला जातोय याची वाट पाहावी लागायची. पण आता हातातल्या मोबाईलमध्येच तुम्ही नवनवे आणि दर्जेदार चित्रपट कधीही, कुठेही आणि तुम्हाला हव्या त्या वेळेनुसार पाहू शकता. ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आताही तु्म्ही काही नवं पाहण्याच्या विचारात असाल, तर वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवर (OTT Platform) नवे 5 सिनेमे आणि मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. अगदी आलिया भट्टच्या जिगरापासून ते साऊथ ब्लॉकबस्टर फिल्म अमरानपर्यंत दर्जेदार चित्रपट ओटीटीवर तुम्ही पाहू शकता.
विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ (Vicky Vidya Ka Woh Wala Video)
राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा चित्रपट 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' OTT प्लॅटफॉर्मवर आला आहे. चित्रपटाची कथा एका जोडप्याच्या हनिमूनच्या व्हिडीओची सीडी चोरीला गेल्याच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं आहे. हा चित्रपट कॉमेडी आणि ट्विस्टनी भरलेला आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ चित्रपट पाहू शकता.
जिगरा (Jigra)
आलिया भट्टचा 'जिगरा' 2024 साली रिलीज झाला होता. ॲक्शननं भरलेला हा ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा सत्या नावाच्या तरुणीची आहे, जी आपल्या भावाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाते. जिगरामध्ये वेदांग रैनानं आलिया भट्टच्या भावाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
View this post on Instagram
अमरन (Amaran)
अमरन हा एक तमिळ चरित्रात्मक चित्रपट आहे, जो भारतीय लष्करातील मेजर मुकुंद वरदराजन यांची कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडतो. त्यांचं शौर्य आणि देशासाठी त्यांनी दिलेलं बलिदान या चित्रपटात सुंदरपणे मांडण्यात आलं आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेय आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. 2024 मध्ये रिलीज झालेला 'अमरन' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं बॉलिवूडचा मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' आणि भूल भूलैय्या 3 लाही पाणी पाजलं, हा चित्रपट आता तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
View this post on Instagram
सिंकदर का मुकद्दर (Sikandar Ka Muqaddar)
सिंकदर का मुकद्दर हा सस्पेन्स क्राईम ड्रामा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या फिल्ममध्ये अविनाश तिवारी, जिमी शेरगिल आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहेत. 'सिकंदर का मुकद्दर'ची कथा 50 कोटींच्या हिऱ्यांच्या चोरीभोवती फिरते. हा चित्रपट सस्पेन्सनी भरलेला असून याचं दिग्दर्शन नीरज पांडे (Neeraj Pandey) यांनी केलं आहे.
मारी (Maeri)
मारी ही एक इमोशनल सीरिज आहे, ज्यामध्ये एक आई आपल्या मुलीसोबत झालेल्या जघन्य अपराधानंतर न्यायाच्या शोधात असते. पण, ज्यावेळी आईच्या सहनशक्तीचा अंत होतो आणि तिचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो, तेव्हा मात्र ती स्वतःच न्याय मिळवण्यासाठी मोठं पाऊल उचलते. या दमदार ड्रामा सीरीजमध्ये तन्वी मुंडले, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील आणि सागर देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. तुम्ही ते Zee5 वर ही सीरिज पाहू शकता.