एक्स्प्लोर

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?

Marathi Actor Ankur Wadhave: 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेनं हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला.

Ankur Wadhave Shares Shocking Attack Incident in Pusad: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) या कॉमेडी शोमधून  घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे (Ankur Wadhave) याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झालाय. 20 - 30 टोळीच्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण नेमकं काय? (Entertainment) 29 मे 2026 रोजी नेमकं काय घडलं? याची माहिती अंकुर विठ्ठलराव वाढवे या कलाकारानं फेसबूक पोस्ट शेअर करुन दिली.  सध्या अंकुरची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, या पोस्टवर नेटकऱ्यांनी अंकुरच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. 

शो, सिनेमा आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे सध्या आपल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमधून त्यानं आपल्यावर प्राणघातक हल्ला झाला असल्याची माहिती दिली. तसेच त्यानं फेसबुक लाइव्ह करत या घटनेची माहिती दिली. 

अंकुरवर प्राणघातक हल्ला, नेमकं घडलं काय? (Ankur Wadhave Alleges Attack By Group Of 20-30 People)

अंकुरने पोस्टमध्ये म्हटलं की, 'काल पुसदमध्ये माझ्यावर 20 ते 30 लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने प्रकरण टळले. पण यावरून लक्षात येते की, पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे', असं म्हणत त्यानं पोस्ट केली. अभिनेत्यानं फेसबुक लाइव्ह करुन या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच अभिनेत्यानं आपली प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. अभिनेत्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करुन अंकुर विठ्ठलराव वाढवेच्या तब्येतीची विचारपूस केली.  

फेसबुक लाइव्ह करत सांगितली आपबिती (Actor Ankur Wadhave Goes Live On Facebook)

'नमस्कार. मला काही झालेलं नाही. पुसदमध्ये सिनेमाचं शुटिंग सुरू होतं.  या सिनेमाचा भाग असणारे माझे मित्र भेटायला आले होते. त्यात काही असे जण होते, ज्यांनी मद्यपान केलं होतं.  ते आमच्या शेजारच्या घरावर लघुशंका करत होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून, आम्ही त्यांना रिटर्न पाठवलं.तिथे एक मुलगा होता, ज्याची चूक होती, तो एकटा 30-40 जण मारहाण करण्यासाठी घेऊन आला होता.  यावेळी त्यातील काही लोकांनी मला ओळखलं.  परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून आम्ही ते प्रकरण तेव्हाच सोडून दिलं'.

'सकाळी मला जाणवलं की पुसदमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून तक्रार दाखल करायची आहे, असं सांगितलं. पोलिसांनी संबंधित तरुणाला बोलावलं. मी त्याला एवढंच सांगितलं की, ज्या घरावर तू लघुशंका करत होता, त्या घरातील वहिनींची माफी माग. खरंतर, या संपूर्ण घटनेतून मला एकच गोष्ट जाणवली की, पुसदमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे', असं अंकुरने आपल्या फेसबुक लाइव्ह व्हिडीओमध्ये म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतंय; आई निवेदिता म्हणाल्या...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget