31 वर्ष जुना चित्रपट, 14 गाणे ठरले होते सुपरहिट, बैलगाडीतून लोक पोहोचायचे थिएटरमध्ये, महारेकॉर्ड बनवणारा सिनेमा
hum aapke hain koun : 31 वर्ष जुना चित्रपट, 14 गाणे ठरले होते सुपरहिट, बैलगाडीतून लोक पोहोचायचे थिएटरमध्ये, महारेकॉर्ड बनवणारा सिनेमा

hum aapke hain koun : नव्वदीच्या दशकातील गाणी आणि सिनेमे आज देखील लोक तेवढ्याच आवडीने पाहाताना दिसतात. काही चित्रपट पाहाण्यासाठी थिएटरमध्ये तोबा गर्दी असायची. असाच एक कौटुंबिक आणि रोमँटिक चित्रपट त्या काळात आला होता, ज्याची कहाणी इतकी भावली होती की हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ 2-4 नाही तर तब्बल 14 गाणी होती आणि ती सगळीच सुपरहिट ठरली होती.
हा चित्रपट म्हणजेच ‘हम आपके हैं कौन’. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित ही लोकप्रिय जोडी झळकली होती. त्याचबरोबर अनेक मल्टीस्टार्स देखील दिसले होते. सूरज बडजात्या यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचं एवढं वेड पडलं होतं की गावखेड्यांमधून लोक बैलगाडीतूनही थिएटरमध्ये हा चित्रपट पाहायला पोहोचत होते. 1994 साली ‘हम आपके हैं कौन’ प्रदर्शित झाला आणि हा एक म्युजिकल कौटुंबिक ड्रामा होता. या चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रोडक्शनने केली होती.
‘हम आपके हैं कौन’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वाधिक थिएटरमध्ये पाहिला गेलेला चित्रपट मानला जातो. त्यावेळी 7 कोटी 39 लाख 62 हजार प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला होता. हा केवळ विक्रम नाही, तर एक महाविक्रम आहे, जो आजतागायत कोणीही मोडू शकलेला नाही.
त्या काळात ‘हम आपके हैं कौन’ ने 116 कोटींचं नेट कलेक्शन केलं होतं, जे आजच्या हिशोबाने जवळपास 700 कोटी रुपये ठरतं. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या सोबत रेणुका शहाणे, मोहनीश बहल, सूरज बडजात्या, आलोकनाथ यांसारखे दिग्गज कलाकारही होते.
14 गाणी आणि सगळीच सुपरहिट
‘हम आपके हैं कौन’ च्या अपार यशामागे त्यातील सुपरहिट गाण्यांचाही मोठा वाटा होता. चित्रपटात एकूण १४ गाणी होती. आणि ती सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. आजही कोणतीही लग्नसराई असो, या चित्रपटातील गाणी हमखास वाजताना ऐकायला मिळतात.
ही आहेत ती 14 गाणी...
1. माई नी माई
2. दीदी तेरा देवर दीवाना
3. मौसम का जादू
4. चॉकलेट लाइम जूस
5. जूते दो पैसे लो
6. पहला पहला प्यार
7. धिकताना
8. बाबुल
9. मझसे जुदा होकर
10. समधी समधन
11. हम आपके हैं कौन
12. वाह वाह रामजी
13. लो चली मैं
14. धिकताना 2
इतर महत्त्वाच्या बातम्या























