एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिजीत बिचुकलेपेक्षा त्याच्या बायकोला अधिक मतं
मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेने मुंबईतल्या वरळी आणि सातारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु दोन्ही ठिकाणी बिचुकलेचं डिपॉझिट जप्त झालं आहे. तर बिचुकलेची पत्नी अलंकृता यांचंदेखील डिपॉझिट जप्त झालं आहे
मुंबई/सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यानेदेखील या निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं. बिचुकलेने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्याची पत्नी अलंकृता बिचुकले यांनीदेखील साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लढवली होती.
बिचुकलेने मुंबईतल्या वरळी आणि सातारा विधानसभेची निवडणूक लढवली. परंतु दोन्ही ठिकाणी बिचुकलेचं डिपॉझिट जप्त झालं आहे. तर बिचुकलेची पत्नी अलंकृता यांचंदेखील डिपॉझिट जप्त झालं आहे. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. तर सातारा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसले जिंकले आहेत.
वरळीमध्ये शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना 89 हजार 248 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना 21 हजार 821 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात अभिजीत बिचुकलेला अवघी 781 मतं मिळाली आहेत. त्यापैकी पाच मतं ही पोस्टाने आली आहेत हे विशेष.
सातारा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 18 हजार 05 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दीपक पवार यांना 74 हजार 581 मतं मिळाली आहेत. तर अभिजीत बिचुकलेला अवघी 759 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघातही बिचुकलेची पाच मतं ही पोस्टाने आली आहेत.
अभिजीत बिचुकले याची पत्नी अलंकृता बिचुकले यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवली. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 6 लाख 36 हजार 620 मतांसह निवडणूक जिंकली आहे. तर या मतदारसंघात माजी खासदार आणि भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. उदयनराजेंना 5 लाख 48 हजार 809 मतं मिळाली आहेत. तर अलंकृता बिचुकले यांना 1 हजार 645 मतं मिळाली आहेत. अलंकृता यांना त्यांच्या मतदारांनी 13 मतं पोस्टाने पाठवली आहेत.
अभिजीत बिचुकले याला दोन्ही विधानसभा निवडणुकीत मिळून अवघी 1540 मतं मिळाली आहेत. (वरळी 781 + सातारा 759) तर त्याच्या पत्नीला 1645 मतं मिळाली आहेत.
...म्हणून माझा पराभव झाला : अभिजीत बिचुकले
कोण आहे अभिजीत बिचुकले?
- साताऱ्यातच मध्यमवर्गीय घरात बिचुकलेचा जन्म झाला - घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा परंपरागत व्यवसाय - बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता - पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला - त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन - त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे - आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले - उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली - पण कधीही 2 हजार मतांच्या वर त्याची मजल गेली नाही - यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता - इतकंच काय त्यानं आपल्या पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं - अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत
संबंधित बातम्याअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement