Uddhav Thackeray: एक है तो सेफ है! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राजकीय विश्लेषकांचं मत काय?
Uddhav Thackeray and Raj Thackeray: पराभव उलटवून लावायचा असल्यास ठाकरे बंधू एकत्र यायला हवे अश्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून
![Uddhav Thackeray: एक है तो सेफ है! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राजकीय विश्लेषकांचं मत काय? Will Raj Thackeray-Uddhav Thackeray come together What is the opinion of political analysts Read the detailed report Uddhav Thackeray: एक है तो सेफ है! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राजकीय विश्लेषकांचं मत काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/08b9a2eea45ba0c9aa0d9123651e053917325976582221075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात महायुतीला एकतर्फी यश गवसलं आहे. या यशाचा फटका दोन्ही ठाकरेंना बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 20 जागा निवडणून आल्या आहेत. तर राज ठाकरेंचा मनसे पक्ष शून्य जागेवर आहे. या निकालानंतर भाजपने ठाकरे संपवलं असे चर्चेत आलं आहे. हा पराभव उलटवून लावायचा असल्यास ठाकरे बंधू एकत्र यायला हवे अश्या चर्चा सुरु आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून..
महाराष्ट्र विधानसभेत मनसेकडून 128 उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले, पण मनसेच्या एकही उमेदवाराचा विजय झाला नाही. दादर माहिम मतदार संघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना हार मानावी लागली. मुंबईकरांच्या मते हे दोन्ही बंधु वेगवेगळे असल्यान मतांची विभागणी झाली. हे दोन्ही बंधू एकत्र असते तर एकहाती सत्ता आली असती.
ठाकरे बंधू एकत्र यावेत या चर्चा संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर ही पोहचल्या, ठाकरेंच्या कुटुंबातील राजकीय शत्रुत्व मैत्रीत यायला हवे का? संजय राऊत यांना विचारण्यात आलं की मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का? त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची व हितचिंतकांची इच्छा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, “हा फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापुरता मर्यादित प्रश्न नाही. ज्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकाने एकत्र आलंच पाहिजे.”
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत थेट टोला लगावला आहे… राज ठाकरे तर कधीही मैत्रीचा हात समोर करतात. पण आमचा पूर्वानुभव वेगळा आहे…. जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, जी मंडळी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती त्यांचा अस्तित्व पणाला लागलं तेव्हा आमची गरज त्यांना वाटते अशी थेट टीका ही महाजनांनी केली आहे.
मनसेच्या उमेदवारांचे म्हणणे काय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यायला हवे का? मुंबईतील मनसे चे उमेदवार संदेश देसाई यांना 2024 च्या विधानसभेला 5037 मत मिळाली आहेत तर 2019 ला ही एवढीच मत त्यांना मिळाली आहेत त्यामुळं शाशंकता निर्माण झाली आहे त्यांच्या पराभवाची कारणे ते शोधत आहे. हा तर निर्णय साहेब आणि नेते निर्णय घेतील, मी छोटा कार्यकर्ता आहे, हा निर्णय साहेब घेतील असे मत त्यांनी मांडले आहे.
राजकीय विश्लेषक यांचे यावर काय मत
दोघे ही आता अडचणीत आहेत. राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांची ताकद होती. नंतर त्यांची ताकद कमी होत गेली. आता उध्दव ठाकरेचं काय झाले माहीत आहे. पण ठाकरे मुंबईत राहिले पाहिजे. ठाकरे हा ब्रँड आहे मुंबईत आहे. याआधी राज ठाकरे यांनू बोललं होत. इकडून साद घातली पाहिजे आणि मग तेथून स्वीकारलं जाईल. या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे. एकमेकांचा सन्मान राखून हे एकत्र आले तर मुंबई महापालिकेत चित्र वेगळे असेल.
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या काळात झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. यामध्ये काहीजण आतले आहेत आणि बाहेरचेही असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असे वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय, असे म्हटले.
उद्धव ठाकरे यांना वाटतं आहे का की राज ठाकरे यांच्यासोबत युती करावी? उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हंटल की महाराष्ट्राचे लुटारी सत्तेत नको. त्यांना लुटारूंना सत्तेत बसवायचे आहे. मी महाराष्ट्राला बांधिल आहे. लुटारूंना सत्तेत बसवण्यासाठी नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. पण आता राज ठाकरे यांचा ही दारुण पराभव झाला आहे त्यामुळं या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.
महाराष्ट्रान 2019 नंतरच्या राजकारणात वेगवेगळ्या युती पाह्यला मिळाल्या, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना तर शिवसेना भाजप आणि काँग्रेस, त्यामुळं राजकारणात आता सर्वच शक्य होत आहे का? हा प्रश्न म्हणून 2009 ला शिवसेनेच्या घरातून बाहेर पडलेले राज ठाकरे पुन्हा एकत्रित येतील का यांची उत्कंठा महारष्ट्राला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)