Chhagan Bhujbal: अजित पवारांकडेच राज्याचं अर्थमंत्रीपद राहणार? छगन भुजबळ मोठं वक्तव्य, म्हणाले, 'माझी खात्री आहे...'
Chhagan Bhujbal: आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडून कोणत्या नेत्यांचा शपथविधी होणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई: आज राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशाचे पंतप्रधान आणि इतर बडे नेते, विविध क्षेत्रातील प्रमुख लोक, अनेक राज्याचे मंत्री शपथविधीला हजेरी लावणार आहेत. दरम्यान अद्याप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उपमुख्यमंत्री पदासाठी मनधरणी सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडून कोणत्या नेत्यांचा शपथविधी होणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणी देखील शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत. शपथविधीची वेळ संध्याकाळची आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर इतर राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते येत आहेत. त्यामुळे वेळेचे बंधन आहे. त्याचबरोबर अजून कोणत्या पक्षाचे किती मंत्री आणि खाते याच्याबाबतीतली चर्चा सुरू आहे. एकदा काही मंत्र्यांनी शपथविधी घेतली आणि नंतर मग त्यांना हवा असलेला आकडा मिळत नसेल, तर मग हवे ते मंत्रिमंडळ किंवा खाती मिळत नसेल तर मग तक्रारी सुरू होतील. आजचा हा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला की, नंतर मग आठवड्याभराच्या काळामध्ये इतर जे मंत्री आहेत, पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन किती कोणाला कोणती खाते हे नक्की होईल आणि आठवडाभरामध्ये सर्वांचे शपथविधी होईल असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले.
अर्थमंत्रीपद अजित पवारांना मिळेल अशी माझी खात्री
अजित दादा बोलायला जरा कडक बोलतात, त्याच्या पाठीमागे शिस्त राबवण्याचा हेतू असतो. राज्याची आर्थिक स्थिती योग्य राहावी हा त्यांचा उद्देश असतो. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे. जे निर्णय आहेत महिला, युवक, शेतकरी आणि विकास या बरोबर राज्याच्या आर्थिक स्थिती व्यवस्थित राहिली पाहिजे, याकरिता त्यांचा कटाक्ष असतो. कोणी चुकलं तर ते बोलतात त्याच्यामागे मनात राग असतो असा भाग नाही त्यांना असं वाटतं की, लोकांनी शिस्तीत वागावं आणि चांगलं काम करावं इतकच त्याचा अर्थ असतो असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणालेत.
शिंदे गटाने देखील अर्थ खातं मागितलं आहे, यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला तसं वाटत नाही. मी आत्तापर्यंत माध्यमांमध्ये पाहिलं आणि वाचलं त्यानुसार शिंदे यांनी विशेषत गृह विभागासाठी आणि नगर विकासासाठी मागणी केली आहे. मला असं वाटत नाही, की त्यांची अर्थ विभागासाठी जास्त मागणी आहे. परंतु जे काही असेल ते शेवटी एकत्रित काम करायचं असेल तर तीन पक्षाचे नेते एकत्रित बसून त्यावर विचार करतील, चर्चा करतील आणि माझे खात्री आहे, अजित पवार यांना अर्थ खातं निश्चितपणे मिळेल. गृह आणि नगरविकाससाठी शिंदेची मागणी होती. अर्थ खात्यासाठी नाही. माझी खात्री आहे, अर्थमंत्री अजित पवार होतील अशा विश्वास देखील यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला आहे.
आमचे 10 मंत्री होते, त्याच प्रमाणात मंत्री द्या अशी आमची मागणी असणार आहे. शिंदे आणि फडणवीस देखील संख्याबळ आधारे खाती मागतील यात शंका नाही असंही ते पुढे म्हणालेत.