राज्यातील सत्तास्थापन लांबणीवर? मुख्यमंत्रीपदी कोण, तिढा कायम; 27, 28 नोव्हेंबरला महायुती सरकार स्थापन होण्याची शक्यता
Maharashtra Politics: 27 किंवा 28 नोव्हेंबरला महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता, 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचं घटनातज्ज्ञांजं मत
![राज्यातील सत्तास्थापन लांबणीवर? मुख्यमंत्रीपदी कोण, तिढा कायम; 27, 28 नोव्हेंबरला महायुती सरकार स्थापन होण्याची शक्यता Who is Maharashtra CM Face? tension remains in Mahayuti Government formation is delayed likely to be formed on November 27, 28 November Know All Details राज्यातील सत्तास्थापन लांबणीवर? मुख्यमंत्रीपदी कोण, तिढा कायम; 27, 28 नोव्हेंबरला महायुती सरकार स्थापन होण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/e3d4431563567168bf2c323c84c9baf6173250166946788_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Who is Maharashtra CM Face? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी (CM Oath-Taking Ceremony) 26 तारखेला होणार अशी चर्चा होती, मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतयं. यामागे दोन ते तीन महत्त्वाची कारणं आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, पूर्ण बहुमताचं सरकार असल्यानं कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे, त्यानंतर अमित शाह (Amit Shah), आणि शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठक होईल, आणि मग त्यानंतर या तिघा नेत्यांचा शपथविधी होईल असं कळतंय. त्यामुळे 27 किंवा 29 तारखेला सत्तास्थापन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल (Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024) लागल्यावर अर्थातच चर्चा सुरू झाली ती, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची... 26 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची मुदत संपतेय. त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र ही धारणा चुकीची असल्याचं अनेक कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. शपथविधी 26 तारखेला झाला नाही तर मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागेल, ही धारणा चुकीची असल्याचं कायदेतज्ज्ञांनी सांगितलंय. यासाठी त्यांनी भूतकाळातील अनेक उदाहरणांचा दाखलाही दिला आहे.
...यावर काम सुरू आहे; मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबईत शिंदेंच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली, या बैठकीत तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी आमदारांनी केली आहे. यावर काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, तुमच्या चेहऱ्यामुळे महायुतीला फायदा झाला असून तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी केली आहे. तसेच, आता मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीचा तिढा वाढणार असल्याचं बोललं जात आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. महायुती एकसंधच आहे, वितुष्ट येईल अशी वक्तव्य टाळा, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईत शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच, आरएसएसच्या कामाचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं असून आभारही मानले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)