एक्स्प्लोर

मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलंत? शिवसेनेचे 56 नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त 28, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत? ठाकरेंच्या नेत्याचे काळजाला हात घालणारे शिंदेंना सात सवाल

Shivsena Uddhav Thackeray on Eknath Shinde: ठाकरे बंधूंनी कोणत्याही साधनांशिवाय आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढत देताना तब्बल 71 जागा मिळवल्या. काँग्रेसनेही 24 जिंकल्या.

Shivsena Uddhav Thackeray on Eknath Shinde: अत्यंत अटीतटीच्या आणि श्वास रोखून धरायला लावलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीला काठावर बहुमत मिळाले. भाजप शिंदे गटाला 118 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंनी कोणत्याही साधनांशिवाय आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढत देताना तब्बल 71 जागा मिळवल्या. काँग्रेसनेही 24 जिंकल्या. त्यामुळे भाजपला मोठा विजय मिळवता आला नाही. दुसरीकडे मुंबईमध्ये गेल्या तीन दशकानंतर प्रथमच भाजपचा महापौर बसण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या सोबतीला शिंदे गट असेल. 

मात्र, ज्या मुंबईमध्ये शिवसेनेने जन्म घेतला, शिवसेना वाढली, आजपर्यंत मराठी महापौर दिले त्या मुंबईत आता मराठी महापौर नसल्याने  ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एकनाथ शिंदे यांना काळजाला हात घालणारे सात प्रश्न विचारले आहेत. राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलं? असा सवाल चित्रे यांनी केला आहे. ते म्हणाले की चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त 28 माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत? अशीही विचारणा त्यांनी केली आहे. 

अखिल चित्रे यांनी काय म्हटलं आहे?

♦️ स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?
♦️ ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?
♦️ “मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे!” ह्या स्व. बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठमाती देऊन काय मिळवलंत ? 
♦️ सत्तेच्या लाचारीत मश्गूल होऊन, शिवसेना फोडून, भाजपाला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलंत ? 
♦️ चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त २८ माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत ? 
♦️ शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपाचा महापौर होईल, राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत ?    
♦️ थैलीशहांना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलंत?

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget