West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, मतमोजणीच्या पहिल्या तासांत ट्विस्ट; टीएमसी की भाजप, कोण आघाडीवर?
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या एका तासामध्येच निकालात ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालाच्या मतमोजणीला (West Bengal Election Result 2026) सुरुवात झाली असून पहिल्या एका तासामध्येच निकालात ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनूसार, भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. (Bengal Election Result 2026) पश्चिम बंगालमधील सुरुवातीच्या कलांनूसार भाजप 125, तृणमूल काँग्रेस 105 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
मतमोजणीआधी बंगालमध्ये राडा- (West Bengal Election Result 2026)
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बिधाननगर (Bidhannagar Election Result 2026) येथे काल रात्री मतमोजणी केंद्राबाहेर अभूतपूर्व राडा झाल्याचे बघायला मिळाले. यात तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री स्ट्रॉंग रूमसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. आयएएनएसच्या वृत्तानुसार, या घटनेदरम्यान घोषणाबाजी आणि प्रति-घोषणाबाजी झाली, ज्याचे लवकरच संघर्षात रूपांतर झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने केंद्रीय दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन समर्थकांना पांगवले. नंतर, तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांना वेगळे करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये बॅरिकेड्स उभारण्यात आले. (Mamata Banerjee)
पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा- (West Bengal Election Result 2026)
पश्चिम बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे. बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावर देशाचं लक्ष लागलं आहे. सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींचीच्या हाती पुन्हा सत्ता येणार की सत्तापालट होणार याकडे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे आजच्या निवडणूक निकालापूर्वी मुंबईत सट्टा बाजार तेजीत आलाय. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ असा सट्टेबाजाराचा कल हाती आला आहे. तामिळनाडूत द्रमुक, आसाममध्ये भाजपला सट्टेबाजाराचा कौल आला असून मुंबईचा सट्टाबाजारही एक्झिट पोलसारखाच कौल देत आहे.
पश्चिम बंगालमध्ये कुणाचं सरकार, एक्झिट पोलचा अंदाज काय?: (West Bengal Election Results 2026)
पश्चिम बंगालमध्ये, बहुतेक जनमत चाचण्यांनी तृणमूल काँग्रेसला (TMC) धक्का बसण्याचा आणि भाजपचा मोठा विजय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तथापि, तृणमूल काँग्रेसने हे अंदाज फेटाळून लावले आहेत आणि ममता बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले आहे की, त्यांचा पक्ष 200 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल.
पश्चिम बंगालची सद्यस्थिती काय आहे? (West Bengal Election Result 2026)
सध्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असून तृणमूल काँग्रेसची (TMC) सत्ता आहे. भाजपने येथे मुख्य विरोधी पक्ष म्हणून तगडे आव्हान दिले आहे. 2021मध्ये TMC ने 215 जागा जिंकल्या होत्या, तर भाजप 77 जागांवर अडकला होता. यावेळी ही लढत अधिक चुरशीची मानली जात आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या निकालांचे सर्व अपडेट्स, VIDEO:
संबंधित बातमी:




















