एक्स्प्लोर

Sangli : काँग्रेसप्रती निष्ठा दाखवायला दरवेळी आम्हाला परीक्षा द्यावी लागते हे दुर्दैव, सांगलीच्या शेवटच्या सभेत विशाल पाटलांची खंत

Jayashree Patil Sangli Sabha : जयश्री पाटील यांचा हिरा हेच चिन्ह काँग्रेसचे खरे निवडणूक चिन्ह आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलं. 

सांगली : काँग्रेसप्रती आमची निष्ठा दाखवायला प्रत्येक वेळी आम्हाला परीक्षा द्यावी लागते हे आमचं दुर्दैव आहे अशी खंत वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली. सांगली विधानसभेतील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सांगता सभेत खासदार विशाल पाटील यांनी हे वक्तव्य केलं. माझी अपक्ष उमेदवारी ही कार्यकर्त्यांच्या आणि सांगलीकर जनतेच्या आग्रहास्तव असल्याचं वक्तव्य अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी केलं. सांगली विधानसभेतील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराची सांगता विशाल पाटलांच्या सभेने झाली. यावेळी विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनी अनेक मुद्द्यावरून भाष्य केले.

संसदेत भाजप आणि मोदी सरकारचा प्रभावीपणे विरोध हा एकट्या खासदाराने केला आणि त्या खासदाराला दुर्दैवाने महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला नव्हता. त्यामुळे काँग्रेसप्रती आमची निष्ठा दाखवायला प्रत्येक वेळा आम्हाला परीक्षा द्यावी लागते हे आमचं दुर्दैव आहे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं.

काँग्रेसचा उमेदवार भाजपची बी टीम

यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, "मिरजमधील दंगलीनंतर दोनदा मदनभाऊंचा झालेला पराभव हा सर्वांच्याच जिव्हारी लागला होता. त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी ही कार्यकर्त्यांच्या आणि सांगलीकर जनतेच्या आग्रहास्तव ठेवली गेलेय. रविवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेच्या भाषणात सर्वात जास्त मलाच टार्गेट केलं. त्यामुळे सांगलीत भाजपशी काँग्रेसच्या उमेदवाराची लढाई नसून ती माझ्याशी लढाई आहे असे वाटतेय. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार हाच भाजपची बी टीम आहे हे त्यांच्या भाषणावरून दाखवून दिले."

आपल्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत

सांगली विधानसभेतील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत खासदार विशाल पाटील बोलत होते. विधानसभा निवडणुकीत आमच्यावर काही आरोप  होत गेले, त्यामुळे वाईट वाटलं असं ते म्हणाले. विशाल पाटील म्हणाले की, लोकसभेलादेखील मी निवडून आल्यावर भाजपला पाठिबा देणार आहे, भाजपचे पाकीट घेऊन विशाल पाटील उभे राहिलेत असेही आरोप केले गेले होते. त्यावेळी तेच लोक सांगत आहेत की आम्ही भाजपची सुपारी घेतली. पण मी निवडून आल्यावर पहिल्यांदा काँग्रेसला पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे यांची माफीदेखील मागितली असं विशाल पाटील म्हणाले.

आमची काँग्रेस जयश्री पाटलांसोबत

विशाल पाटील म्हणाले की, "काँग्रेसमध्ये जो पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो तो प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेत असतो. त्यामुळे सांगलीत आमची काँग्रेस ही जयश्री पाटील यांच्यासोबत आहे. सांगलीत वसंतदादा पडावेत  म्हणून इंदिरा गांधीनीही सांगलीत येऊन सभा घेतल्या होत्या. पण इंदिरा गांधींनी उभ्या केलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. जयश्रीताईंनी काही मागितलं तर घराणेशाहीचा आरोप केला जातो. या मतदारसंघातील काँग्रेस सातत्याने संपेल यासाठी प्रयत्न करत होते तीच लोक आज आम्हाला काँग्रेसच्या निष्ठेची गोष्ट सांगत आहेत."

विशाल पाटील म्हणाले की, "अपक्ष  निवडणूक लढवायला किती अडचणी येतात हे मला माहीत होतं. त्यामुळे जयश्रीताईंनी निवडणूक लढवावी ही माझीही  इच्छा नव्हती.पण शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जयश्रीताईंना उमेदवारी ठेवावी लागली. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये, आमच्या कुटुंबात भांडणे लावायचा प्रयत्न केला गेला हे नक्की आहे. जयश्री पाटील यांचा हिरा हेच चिन्ह काँग्रेसचे खरे निवडणूक चिन्ह आहे. मात्र यंदा सांगली विधानसभेत भाजपचा एवढ्या फरकाने पराभव करा की शेजारच्या मतदारसंघांमधून आपल्याला दिला जाणारा भाजपकडूनचा त्रास संपावा."

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget