एक्स्प्लोर

मोठी बातमी! विरार कॅश कांड प्रकरण भोवणार? विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde : आचारसंहितेच्या काळात पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि विरारचे भाजपचे उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पाच कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यानंतर विरारमधील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये धडकले. त्यांनी थेट विनोद तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. काही काळ तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही पाहायला मिळाली.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं होतं. 

क्षितिज ठाकूर भडकले

बविआ कार्यकर्त्यांचा राडा सुरू असतानाच क्षितिज ठाकूर विवांता हॉटेलमध्ये पोहोचले.. झाल्या प्रकारामुळे संतापलेल्या क्षितिज ठाकूरांनी विनोद तावडेंसमोर, भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात रौद्ररुप धारण केलं. केवळ एवढ्यावरच क्षितिज ठाकूर थांबले नाहीत तर त्यांनी विनोद तावडेंसमोर बॅगेतून सापडलेली डायरी आणि कॅशवरून प्रश्नांचा भडिमार केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली

वसईच्या तुळींज विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला नऊ लाख 93 हजार पाचशे रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रेही सापडले आहेत. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असून पोलिसांनीसुद्धा तशी तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे एक तासाच्या आत सदर बाबतीत गुन्हाही दाखल करण्यात येईल असे मत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.

भाजप नेत्यानेच माहिती दिल्याचा हितेंद्र ठाकूरांचा दावा

क्षितीज ठाकूरांपाठोपाठ स्वत: हितेंद्र ठाकूरही हॉटेलमध्ये पुोहोचले. त्यांनीही आधी विनोद तावडेंना प्रश्न विचारले. तसंच भाजप नेत्यानेच फोन करून, तावडे 5 कोटी घेऊन विरारमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: मुंबई रायगडमध्ये रेड अलर्ट! कोकण उत्तर महाराष्ट्रात पाऊस झोडपणार, कुठे कोणता अलर्ट? 
मुंबई रायगडमध्ये रेड अलर्ट! कोकण उत्तर महाराष्ट्रात पाऊस झोडपणार, कुठे कोणता अलर्ट? 
Saroj Patil: अजित वरून कठीण दिसत असला, तरी आतून नारळासारखा, आमचा लाडका रोहितही धीट झालाय, एनडी पाटलांची जागा घेतोय की काय वाटतं; माईंकडून कौतुकाची थाप
अजित वरून कठीण दिसत असला, तरी आतून नारळासारखा, आमचा लाडका रोहितही धीट झालाय, एनडी पाटलांची जागा घेतोय की काय वाटतं; माईंकडून कौतुकाची थाप
Sangli News: सांगलीत तीन पाटलांच्या एकत्रित फोटोची चर्चा! आजी माजी खासदार अन् पृथ्वीराज पाटील एकाच व्यासपीठावर रंगले गप्पांमध्ये
सांगलीत तीन पाटलांच्या एकत्रित फोटोची चर्चा! आजी माजी खासदार अन् पृथ्वीराज पाटील एकाच व्यासपीठावर रंगले गप्पांमध्ये
Mumbai Crime: मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने 23 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, गोरेगावमधील धक्कादायक घटना
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने 23 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, गोरेगावमधील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: मुंबई रायगडमध्ये रेड अलर्ट! कोकण उत्तर महाराष्ट्रात पाऊस झोडपणार, कुठे कोणता अलर्ट? 
मुंबई रायगडमध्ये रेड अलर्ट! कोकण उत्तर महाराष्ट्रात पाऊस झोडपणार, कुठे कोणता अलर्ट? 
Saroj Patil: अजित वरून कठीण दिसत असला, तरी आतून नारळासारखा, आमचा लाडका रोहितही धीट झालाय, एनडी पाटलांची जागा घेतोय की काय वाटतं; माईंकडून कौतुकाची थाप
अजित वरून कठीण दिसत असला, तरी आतून नारळासारखा, आमचा लाडका रोहितही धीट झालाय, एनडी पाटलांची जागा घेतोय की काय वाटतं; माईंकडून कौतुकाची थाप
Sangli News: सांगलीत तीन पाटलांच्या एकत्रित फोटोची चर्चा! आजी माजी खासदार अन् पृथ्वीराज पाटील एकाच व्यासपीठावर रंगले गप्पांमध्ये
सांगलीत तीन पाटलांच्या एकत्रित फोटोची चर्चा! आजी माजी खासदार अन् पृथ्वीराज पाटील एकाच व्यासपीठावर रंगले गप्पांमध्ये
Mumbai Crime: मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने 23 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, गोरेगावमधील धक्कादायक घटना
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने 23 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, गोरेगावमधील धक्कादायक घटना
Beed Crime : तू आमचा वाद का मिटवतोस? भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना
तू आमचा वाद का मिटवतोस? भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना
Ajit Pawar on Rohit Pawar: काही जणांना वाटतं आपण लईच मोठं झालो आहोत, दुसऱ्यांच्या पक्षात नाक खूपासयची गरज नाही; पक्ष 'हायजॅक'वरून अजितदादांचा पुतण्या रोहित पवारांना खोचक टोला!
काही जणांना वाटतं आपण लईच मोठं झालो आहोत, दुसऱ्यांच्या पक्षात नाक खूपासयची गरज नाही; पक्ष 'हायजॅक'वरून अजितदादांचा पुतण्या रोहित पवारांना खोचक टोला!
Vice Presidential Election: उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार उद्या ठरणार; भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार उद्या ठरणार; भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
Crime News : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बनावट नोटा छापायला शिकले, स्वतःच्या घरातच उभारला कारखाना, पोलिसांनी छापा टाकला अन्...
यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बनावट नोटा छापायला शिकले, स्वतःच्या घरातच उभारला कारखाना, पोलिसांनी छापा टाकला अन्...
Embed widget