एक्स्प्लोर
Advertisement
मनसेच्या सभेत मंचावर आणलेल्या चिले कुटुंबाचा संबंध विनोद तावडेंनी पाकिस्तानशी जोडला
पाकिस्तान डिफेन्स नावाच्या पेजवरही याच फॅमिलीचा फोटो भारतातील मिडल क्लास फॅमिली म्हणून दाखवलेला आहे. पाकिस्तान डिफेन्स पेज हे पाकिस्तान संरक्षणखात्याचं अधिकृत पेज नाही, असंही तावडे म्हणाले.
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभेत मंचावर बोलावलेल्या चिले कुटुंबाचा संबंध शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाकिस्तानशी जोडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘मोदी है तो मुमकीन है’ जाहिरातीतील चिले कुटुंबाला समोर आणून खोट्या जाहीरातीची पोलखोल केली होती. यावर तावडे यांनी हा आरोप केला आहे. भाजपचे आयटी सेलवाले कोणाचेही फोटो घेवून त्याचा उपयोग जाहीरातीसाठी करत आहेत, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.
यावेळी तावडे म्हणाले की, संबुद्धा मित्र मुस्तफी यांनी एक मुलाखत घेतली होती. त्यांना मनसेचे कार्यकर्ते असलेल्या चिलेंनी मुलाखत दिली होती. त्यावेळी घेतला गेलेला हा फोटो आहे. हा फोटो चिले कुटुंबीयांनी स्वत:हून दिलेला आहे.
पाकिस्तान डिफेन्स नावाच्या पेजवरही याच कुटुंबाचा फोटो भारतातील मिडल क्लास फॅमिली म्हणून दाखवलेला आहे. पाकिस्तान डिफेन्स पेज हे पाकिस्तान संरक्षणखात्याचं अधिकृत पेज नाही, असंही तावडे म्हणाले.
तावडे पुढे म्हणाले की, इम्रान खान जे म्हणतात त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी बोलत नाही. मनसेच बोलते. मनसेचे नेते राज ठाकरे पाकिस्तान मीडियात हिरो होतात. यावरुन मनसे-पाकिस्तान असंही काही कनेक्शन आहे का? याची चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या नावानंही अनेक पेजेस आहेत. ते सगळेच अधिकृत नाहीत. त्यांच्या अधिकृत पेज वर असलेली माहितीच आम्ही खरी मानतो. ज्या परिवाराचा फोटो वेगवेगळ्या ठिकाणी मिडल क्लास इंडियन फॅमिली म्हणून वापरला गेलाय, तोच फोटो दाखवून उगाच काहीतरी सनसनाटी क्रिएट करण्याचा राज ठाकरे प्रयत्न करतात, असे तावडे म्हणाले.
आता 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी-शाहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपदेखील व्हिडीओचाच आधार घेणार आहे. 27 तारखेला होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच स्टाईलनं उत्तर मिळणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं. त्यामुळं मनसे आणि राज ठाकरेंची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागलाय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement