एक्स्प्लोर
Advertisement
Vikramgad Vidhan Sabha : विक्रमगड विधानसभा मतदारसंघ : भाजपचे हरिश्चंद्र भोये यांचा शरद पवारांच्या सुनील भुसारा यांना धोबीपछाड
Vikramgad Assembly Constituency Election 2024 : विक्रमगड विधानसभेत भाजपचे हरिश्चंद्र भोये यांनी शरद पवारांचे उमेदवार सुनील भुसारांना धोबीपछाड दिला आहे.
Vikramgad Vidhan Sabha Election 2024 : विक्रमगड विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र भोये यांनी शरद पवारांचे उमेदवार सुनील भुसारा यांचा पराभव केला आहे. यंदा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांना तिकीट दिलं, तर महायुतीकडून भाजपचे हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विक्रमगड विधानसभेत शरद पवार पक्षाचे सुनील भुसारा आणि भाजपचे हरिश्चंद्र भोये आमने-सामने होते यंदा राजकीय समीकरणे खूप बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली, त्यामुळे यातील एक गट भाजप सोबत तर दुसरा गट काँग्रेससोबत निवडणुकीत उतरला. यामुळे विधानसभेची ही लढत रोमांचक झाली. अखेर मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं.
कसा आहे मतदारसंघ?
2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर विक्रमगड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात आता पर्यंत 2009, 2014 आणि 2019 या फक्त तीन निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत दोन वेळा भाजप उमेदवाराला विजय मिळाला आहे, पण 2014 मध्ये इथे भाजपचा पराभव झाला. 2014 मध्ये मतदारराजाने भाजपला नाकारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला. सध्या सुनील चंद्रकांत भुसारा येथी विद्यमान आमदार आहेत.
राजकीय समीकरण
विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जातीय समीकरण ही महत्त्वाचं आहे. विक्रमगडमध्ये आदिवासी मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे विक्रमगड मतदारसंघात आदिवासी मतदारांचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात आदिवासी समाजाचा मतदार आधार 88 टक्क्यांहून अधिक आहे, दलित मतदारांची संख्या एक टक्के, तर मुस्लिम मतदारांची संख्या 2 टक्के आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची संख्याही महत्त्वाची आहे, कारण या क्षेत्रातील 95 टक्के मतदार ग्रामीण भागात राहतात आणि केवळ 5 टक्के शहरी भागात राहतात.
याआधीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्यातील एक मतदारसंघ. माजी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा 2014 ला विक्रमगडमधून निवडून गेले. सावरा यांना राज्याच्या कारभारातही आपली छाप पाडता आली नाही, त्यामुळे जनतेने भाजपकडे पाठ वळवली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, विक्रमगड विधानसभा क्षेत्रात एनसीपीच्या सुनील भुसारा आणि भाजपाच्या डॉ. हेमंत सवारा यांच्यात थेट टक्कर होती. हेमंत सवाराला या निवडणुकीत 67,026 मते मिळाली, तर सुनील भुसारा यांनी 88,425 मते मिळून विजय मिळवला. या क्षेत्रातील मतदारांचा मूड भाजपाच्या विरोधात होता. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
विक्रमगड विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल
- हरिश्चंद्र भोये - भाजप (विजयी)
- सुनील भुसारा - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
विक्रमगड विधानसभा निवडणूक 2019 निकाल
- सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस) - 88425 मते (विजयी)
- डॉ. हेमंत सावरा (भाजप) - 67026 मते
- नोटा - 8495 मते
विक्रमगड विधानसभा निवडणूक 2014 निकाल
- विष्णू रामा सावरा (भाजप) - 40201 मते
- प्रकाश निकम (शिवसेना) - 36356 मते
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
हिंगोली
शिक्षण
Advertisement