एक्स्प्लोर

"राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचितचे कार्यकर्ते करतील", भर सभेत सुजात आंबेडकरांची सडकून टीका!

वंचित बहुनज आघाडीकडून धडाडीने प्रचार केला जात आहे. सुजात आंबेडकर यांनी एका सभेत राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे (Vidhan Sabha Election 2024) संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण सध्या राजकारणमय झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यात सध्या जागावाटपावर चर्चा चालू आहे. एकीकडे या दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलेली असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेदेखील (Vanchit Bahujan Aghadi) दंड थोपटले आहेत. वंचितने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असून नेते जोमाने प्रचार करत आहेत. दरम्यान अशाच एका प्रचारसभेत बोलताना सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.      

सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

सुजात आंबेडकर वाशिममध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना "मोठ्या स्पीकरवर, भोंग्यांवर हनुमान चालिसा लावले तर त्याला विरोध करण्याचं काम तसेच राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत पाच ते सहा मुस्लीम उमेदवार निवडून येणार नाहीत, तोपर्यंत मुस्लीम समाजाचं भलं कोणीही करू शकत नाही," असं सुजात आंबेडकर म्हणाले. 

15 टक्के भागिदारी देईल, त्यालाच...

तसेच, "काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रस्थापित नेते आपला विकास करू शकत नाही. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 15 टक्के आहे. जो पक्ष आम्हाला 15 टक्के भागिदारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल, त्यालाच मुस्लीम समाज मतदान करेल," असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? 

दरम्यान, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. वंचितने आपल्या उमेदवारांच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. वंचितची तिसरी यादी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. लवकरच आणखी जाही जागांवर हा पक्ष आपले उमेदवार देणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीचे अनेक प्रयत्न झाले. मात्र शेवटी लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यावेळीही वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

VBA Candidate : विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा नाही, वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले....

'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर

उद्धव ठाकरेंचा धमाका, तब्बल 32 उमेदवार जवळपास निश्चित, संभाव्य यादी 'माझा'च्या हाती!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special ReportEknath Shinde PC : महायुतीच्या जागावाटपावर बैठकीत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदेSpecial Report Santosh Bangar : संतोष बांगर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रारTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19  OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
Varsha Gaikwad : आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Embed widget