VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 : वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र विधानसभेसाठी आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अमित ठाकरे अन् रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आला आहे.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची आठवी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आठव्या यादीत 43 नावांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीनं त्यांची भूमिका कायम ठेवत कोणत्याही आघाडीत किंवा युतीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवत आहे. आजच्या आठव्या यादीतनं वंचितनं अमित ठाकरे आणि रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचितच्या यादीत कुणाला संधी ?
जळगाव ग्रामीण- प्रवीण सपकाळे
अमळनेर- विवेकानंद पाटील
एरंडोल-गौतम पवार
बुलढाणा - प्रशांत वाघोदे
जळगाव जामोद-डॉ. प्रवीण पाटील
अकोट-दीपक बोडके
अमरावती- राहुल मेश्राम
तिरोरा- अतुल गजभिये
राळेगाव- किरण कुमरे
उमरखेड- तात्याराव हनुमंते
हिंगोली- जावेद सय्यद
फुलंब्री- महेश निनाळे
औरंगाबाद पूर्व- अफसर खान यासीन खान
गंगापूर- अशोक चंडालिया
वैजापूर- किशोर जेजुरकर
नांदगाव- आनंद शिनगारी
भिवंडी ग्रामीण- प्रदीप हरणे
अंबरनाथ - सुधीर बागुल
कल्याण पूर्व- विशाल पावशे
डोंबिवली- सोनिया इंगोले
कल्याण ग्रामीण-विकास इंगळे
बेलापूर- सुनील प्रभू भोले
मागाठाणे- दीपक हनवते
मुलुंड- प्रदिप शिरसाठ
भांडूप पश्चिम- स्नेहल सोहनी
चारकोप-दिलीप लिंगायत
विलेपार्ले- संतोष अमुलगे
चांदिवली- दत्ता निकम
कुर्ला- स्वप्नील जवळगेकर
वांद्रे पश्चिम- आफीक दाफेदार
माहीम- आरिफ उस्मान मिठाईवाला
भायखळा - फहाद खान
कोथरुड- योगेश राजापूरकर
खडकवासला- संजय धिवर
श्रीरामपूर - अण्णासाहेब मोहन
निलंगा- मंजू निंबाळकर
माढा - मोहन हळणवर
मोहोळ- अतुल वाघमारे
सातारा - बबन करडे
चंदगड- अर्जुन दुंडगेकर
करवीर- दयानंद कांबळे
इचलकरंजी - शमशुद्दिन हिदायतुल्लाह मोमीन
तासगाव- कवठे महाकाळ -युवराज घागरे
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its eighth list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/l4i5Dh4u36
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 27, 2024
वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची अदलाबदली
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीने 22 - बुलढाणा सदानंद माळी यांच्या जागी प्रशांत उत्तम वाघोदे, 109 - औरंगाबाद पूर्व विकास दांडगे यांच्या जागी अफसर खान यासीन खान आणि 111 - गंगापूर सय्यद गुलाम नबी सय्यद यांच्या जागी अनिल अशोक चंडालिया यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.
वंचित बहुजन आघाडी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार
वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वंचितला महाविकास आघाडीमध्ये अपक्षेइतक प्रतिनिधीत्व मिळत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी विधानसभेला वेगळी भूमिका घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार वंचितनं यावेळी कोणत्याही राजकीय पक्षासोबत म्हणजेच महायुतीतील भाजप, शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसोबत सध्या युतीत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं आगामी काळात वंचित बहुजन आघाडीकडून किती उमेदवारांची नावं घोषित केली जातात हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :