एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार; वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य 

Prakash Ambedkar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठे विधान केलं आहे.

Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभरात जोरदार प्रचार केला जात आहे. या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय खलबत देखील रंगू लागली आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठे विधान केलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे मोठे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे वंचित आगामी काळात नेमका काय पवित्रा घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.        

निकालानंतर महायुती आणि मविआचे पर्याय खुले- प्रकाश आंबेडकर

राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज  प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन असून सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं. या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. तर 'बटेंगे तो कटेंगे"च्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला आहे. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकरांनी यावेळी बोलतांना केला आहे. ते अकोला येथे बोलत होते.

सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे-प्रकाश आंबेडकर

तुम्ही सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तरीही तुम्ही भाजपाला मतदान करत असाल तर तुम्हाला कोण वाचवेल? अनेक वर्ष काँग्रसने सत्ता केली. त्यानंतर भाजप आल मात्र काय बदल झाला? तरी तुम्ही काँग्रेस आणि भाजपाला मतदान करता. साचलेल पाणी गढूळ होतं, त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. कारण त्यात अळ्या असतात. असाच सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे. अशी टीका ही प्रकाश आंबेडकरांना बुलढाणा येथील सभेतून सरकारवर केली आहे. मी ओबीसींना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेलं. आता सुप्रीम कोर्टाच्या नावाने विधानसभा झाल्या की शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget