UP Election 2022 : उत्तर प्रदेशसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध ; शिक्षण, लॅपटॉपसह मोफत वीजेची घोषणा
UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मोफत शिक्षण, लॅपटॉप, निवृत्तांना पेन्शन, मोफत वीज यासह अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
UP Election 2022 : आगामी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आज सकाळी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर आजच समाजवादी पक्षानेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मोफत शिक्षण, लॅपटॉप, निवृत्तांना पेन्शन, मोफत वीज यासह अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार आले तर, सर्व पिकांसाठी एमएसपी (हमीभाव) दिला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांत पैसे दिले जातील. चार वर्षात राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार. सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज आणि बिनव्याजी कर्ज दिले जाईल. मनरेगाच्या धर्तीवर नागरी रोजगार हमी कायदा करण्यात येणार, महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 33 टक्के आरक्षण दिले जाईल. मुलींचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाईल, अशा घोषणा समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.
समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यातील घोषणा
घरगुती वापरासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज
शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 25 लाख रूपये दिले जाणार, यासोबतच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे स्मारक उभारण्यात येणार
बीपीएल कुटुंबांना दोन सिलिंडर गॅस मोफत दिले जाणार
राज्यातील सर्व तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार कमी केला जाईल
महाविद्यालयांच्या जागा दुप्पट करणार
12 पास सर्व विध्यार्थ्यांना मोफत लॅपटॉत देण्यात येईल
आरोग्य निधी सध्याच्या निधीपेक्षा तीन पटीने वाढवणार
कॉलसेंटर आणि वृद्धाश्रम सुरू करणार
उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये महिलांना 33 टक्के जागासीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनद्वारे देखरेख केली जाणार
पोलिसांचा प्रतिसाद वेळ 15 मिनिटांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
उद्योगांसाठी सिंगल रूफ क्लिअरन्स सिस्टीम तयार केली जाईल.
जुनी पेन्शन पुन्हा सुरू करून 2005 पूर्वीची योजना लागू केली जाईल
महत्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज
- UP Election: योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव? उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मुकुट कुणाच्या डोक्यावर? जाणून घ्या जनता कौल काय...
- UP Election: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी राज? भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरशीची लढत