एक्स्प्लोर

UP Election: योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव? उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मुकुट कुणाच्या डोक्यावर? जाणून घ्या जनता कौल काय...

ABP CVoter Survey for UP Election 2022: एबीपी न्यूजच्या सी वोटर सर्व्हेच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वाधिक मतं मिळण्याची शक्यता आहे. 

लखनौ: उत्तर प्रदेशच्या सत्तेच्या चाव्या या योगी आदित्यनाथ यांच्याकडे जाणार की अखिलेश यादव बाजी मारणार हे येत्या महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. असं असलं तरी उत्तर प्रदेशच्या एबीपी न्यूजच्या सी वोटर सर्व्हेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं दिसतंय. तर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

एबीपी माझाने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नावाला सर्वाधिक म्हणजे 43.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर अखिलेश यादव यांच्या नावाला 33.7 टक्के लोकांना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसपच्या मायावती असून त्यांच्या नावाला 15.6 टक्के लोकांना पसंती दिली आहे. प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ 4.4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 

मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती? 

उत्तर प्रदेश       जानेवारी     फेब्रुवारी
योगी आदित्यनाथ (भाजप) 43 43
अखिलेश यादव (सपा)     33.9   33.7
मायावती (बसपा)   14.4 15.6
प्रियंका गांधी (काँग्रेस) 3.9   4.4
जयंत चौधरी (आरएलडी) 1.7 1.4

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार
एबीपी माझाने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी राज येण्याची शक्यता असल्याचं दिसून आलं आहे. या सर्व्हेनुसार, भाजपला 225-237 जागा मिळण्याची शक्यता आहे तर समाजवादी पक्षाला 139-151 टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला 13-21 तर काँग्रेसला केवळ 4-8 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

या सर्व्हेनुसार, भाजपला 41.2 टक्के मतं तर समाजवादी पक्षाला 35 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. मायावतींच्या बसपाला 14.2 टक्के मतं तर काँग्रेसला 7 टक्के मतं आणि इतर पक्षांना 2.6 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  उत्तर प्रदेशातील एकूण 403 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा 10 फेब्रुवारीला असणार आहे. त्यानंतर 14, 20, 23, 27 फेब्रुवारी त्यानंतर 3 आणि 7 मार्च अशी सात टप्प्यांत मतदान प्रकिर्या पार पडणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे

सूचना:  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार वेगाने सुरु आहे. ओपिनियन पोल सी-वोटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील  1 लाख 36 हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला आहे. 690 मतदारसंघामध्ये याबाबतचा अभ्यास केला. हा सर्व्हे 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकष सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget