कोल्हापूर 'दुसऱ्या' स्थानी, महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालले टॉप 10 मतदारसंघ कोणते?
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात यंदा 5 टप्पात मतदान संपन्न झालं. त्यामध्ये, सर्वाधिक मतदान 63.71 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झालं असून दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदान झालं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील पाचही टप्प्यातील मतदानाची (Voting) सांगता झाली. 20 मे रोजी मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मात्र, मुंबईकर मतदारांनी अपेक्षाभंग केल्याचं दिसून आलं. कारण, मतदानाच्या टक्केवारीत पुन्हा एकदा मुंबईकर (Mumbai) पिछाडीवर असल्याचे दिसून आले. राज्यातील 5 टप्प्यांपैकी पाचव्या टप्पात सर्वात कमी म्हणजे 54.33 टक्के मतदान झाले. त्यामुळे, एकूण झालेल्या 5 टप्प्यांपैकी पहिल्या व तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, मेट्रो सिटीपेक्षा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातच मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान केल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabhe 2024) सर्वाधिक मतदान करणारे टॉप 10 मतदारसंघ जाणून घेऊया. त्यामध्ये, पहिल्या क्रमांकावर गडचिरोली-चिमूर मतदारसंघ आहे.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात यंदा 5 टप्पात मतदान संपन्न झालं. त्यामध्ये, सर्वाधिक मतदान पहिल्या टप्प्यात झालं आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदान झालं आहे. तिसऱ्या टप्प्यात पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढली असून 63.55 टक्के मतदान झाले. तर, चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरुन 59.64 टक्के मतदान झालं आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात ही टक्केवारी आणखी घसरली असून पावच्या टप्प्यात सर्वात कमी 54.33 टक्के मतदान झालं आहे. देशातील 5 व्या टप्प्यातील मतदानाची सरासरी 60.39 टक्के आहे.
महाराष्ट्रातील पहिले 5 टप्पे
पहिल्या टप्प्यात 63.71 टक्के मतदान झालं असून 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये, गडचिरोल-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 71.88 टक्के मतदान झालं आहे.
दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघात मतदान घेण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.85 टक्के मतदान झाले आहे.
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदारसंघांचा समावेश असून या टप्प्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 71.59 टक्के मतदान झाले आहे. तर, हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक 71.11 टक्के मतदान आहे.
चौथ्या टप्प्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मतदान झाले असून चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघात 59.64 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, सर्वाधिक मतदान बीड लोकसभा मतदारसंघात झाले असून बीडमध्ये 70.92 टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रातील शेवटच्या आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील 5 व्या टप्प्यात सर्वात कमी 54.33 टक्के मतदान झाले. त्यामध्ये, मुंबईतील 6 मतदारसंघांसह एकूण 13 मतदारसंघाचा समावेश होता. पाचव्या टप्प्यात दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक 62.66 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ
1. गडचिरोली-चिमूर - 71.88
2. कोल्हापूर - 71.59
3. हातकणंगले - 71.11
4. नंदूरबार - 70.68
5. बीड - 70.92
6. जालना - 69.14
7. चंद्रपूर - 67.55
8. भंडारा गोंदिया - 67.04
9. अहमदनगर - 66.16
10. वर्धा - 64.85