Eknath Shinde Health Update: घशात वेदना, पांढऱ्या पेशी वर-खाली; ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाताना एकनाथ शिंदे म्हणाले...
Eknath Shinde Health Update: ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे. त्यासाठी ते आज काही वेळापुर्वी रूग्णालयात दाखल झाले, त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
Eknath Shinde Health Update: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सर्दी, ताप आणि घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र अद्याप त्यांची प्रकृती सुधारलेली नाही. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी देखील करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे. त्यासाठी ते आज काही वेळापुर्वी रूग्णालयात दाखल झाले, त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रूग्णालय परिसरात दाखल होताच पत्रकारांनी त्यांना तब्येत कशी आहे? अशी विचारणा केली. त्यावर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) तब्येत बरी आहे, बरी आहे इतकच उत्तर दिलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्व बैठका, गाठी-भेटी रद्द केल्याची माहिती आहे.
आज त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालय योग्य ते उपचार केले जातील. त्यांच्यासोबत त्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काल आणि आज सलाईन लावल्याची माहिती आहे. त्यांची औषधं सुरु आहेत. ते आज होणाऱ्या बैठकीला जाण्याची कमी शक्यता आहे. डॉक्टर त्यांना काय सल्ला देतात, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. दरम्यान गेल्या 4 ते 5 दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
कोणत्या कारणासाठी शिंदे रूग्णालयात?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घशाचा संसर्ग झाला आहे. त्याच्या तपासण्या घरी करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नयेत. जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ, असं शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - मोठी बातमी : एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात