(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात
Eknath Shinde Helth Report: एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Eknath Shinde Medical Report: राज्यात नव्या सरकार स्थापनेआधी घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला असल्याने त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. तेथील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे.
दरेगावात दोन दिवस आराम मग ठाण्याला रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीत महायुतीच्या बैठकीनंतर मुंबईत न थांबता साताऱ्यातील आपल्या मुळगावी दरे येथे गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरेगावात ते आजारी असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यानंतर ते ठाण्याला गेले. त्यानंतर देखील त्यांची तब्येच सुधारली नाही. त्यांचा घसा दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत, त्यामुळे देखील उपचार करावे लागणार आहेत. सतत अँटी बायोटीक दिल्याने अशक्तपणा आल्याने देखील उपचार करावे लागणार असल्याने एकनाथ शिंदे ज्युपिटरमध्ये दाखल झाले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू असून थोड्याच वेळात सोडण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
दरेगाववरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाण्याच्या निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्णपणे नव्हती, त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार त्यांनी अनेक आमदारांच्या आणि नेत्यांच्या भेटी टाळल्या, त्यानंतर त्यांची डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी केली. मात्र, चाचणी निगेटिव्ह आली आहे, मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूच आहेत. आता जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने ते कुठेही बैठकीला जाणार नसल्याचं बोललं जात आहे. आता ते ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. मात्र, त्यांना अॅडमिट केलं जाणार की घरीच आरामाचा सल्ला देणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
आझाद मैदानावर महायुती सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु
दरम्यान, दुसरीकडे 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातलेल्या महायुती सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली. बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज हे सुजाता सौनिक यांना भेटण्यासाठी निघाले आहेत. हे दोघे सुरक्षा व्यवस्था आणि शपथ ग्रहण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी सुजाता सौनिक यांच्या भेटीला आल्याची माहिती कळते. शपथविधीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यासोबतच महायुतीचे आमदारही मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.