तेलंगणा निवडणूक निकाल : टीआरएसने 88 जागा जिंकत सत्ता राखली
सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याची विधानसभा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भंग केली होती. त्यानंतर या निवडणुका घेण्यात आल्या. सर्व्हेनुसार के. चंद्रशेखर राव यांचे तेलंगणा राष्ट्रीय समिती ( टीआरएस ) या पक्षाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या 119 जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) 88 जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. तर काँग्रेस याठिकाणी दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 19 जागांवर विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने 5 जागा अधिक जिंकल्या आहेत.
एमआयएमनेही 7 जागा जिंकल्या आहेत. भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तेलगू देसम पार्टीला 2, ऑल इंडिया फॉरर्वड ब्लॉकला 1 आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
तेलंगणात 7 डिसेंबर रोजी या जागांसाठी मतदान झाले होते. पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याची विधानसभा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भंग केली होती. त्यानंतर या निवडणुका घेण्यात आल्या. सर्व्हेनुसार के. चंद्रशेखर राव यांचे तेलंगणा राष्ट्र समिती ( टीआरएस ) या पक्षाचे पारडे जड होतं.
आंध्र प्रदेशातून वेगळा झालेल्या तेलंगणा राज्याच्या दुसऱ्यांदा निवडणुका होत आहेत. टीआरएसने गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला होता. या वेळेस पुन्हा एकदा टीआरएस सत्ता राखली आहे.
कॉंग्रेसनेही आपली दावेदारी ठामपणे सांगतली होती तर भाजपानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
प्रतिष्ठा पणाला
तेलंगणाची निवडणूक ही सर्वच पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. प्रचारात आरोप प्रत्यारोप झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभा झाल्या. ज्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.
तेलंगणा विधानसभा 2013 चं पक्षीय बलाबल
- टीआरएस- 90
- कॉंग्रेस- 13
- एमआयएम- 7
- टीडीएस - 3
- सीपीआय - 1
संबंधित बातम्या
तेलंगणा विधानसभा निवडणूक | अकबरुद्दीन ओवेसी विजयी
Election Results Live Updates: बसपचा भाजपला पाठिंबा नाही
विधानसभा निवडणूक निकाल : भाजपची पिछेहाट, PM मोदींची चुप्पी
वसुंधरा जिंकल्या, पण राजस्थान भाजपकडून निसटलं
मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव, काँग्रेसची सत्ता गेली !
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल : रमणसिंहांच्या साम्राज्याला हादरा