एक्स्प्लोर

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, पुढील प्रक्रिया कशी असणार? छगन भुजबळ यांनी माहिती दिली

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांचा सायंकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी सर्वानुमते विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. आता यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी व्हावा, असं पत्र देणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. 

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत दोन निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्याचा आणि विधानमंडळासंदर्भातील सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात यावेत, असा ठराव मांडल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.  राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले, त्यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहोत.

विधीमंडळ गटनेता म्हणुन सुनेत्रा पवार यांची निवड करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळ यांनी मांडला  या प्रस्तावाला सुरुवातीला हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर छगन भुजबळ, संजय बनसोडे, धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ यांनी अनुमोदन दिलं.विधीमंडळ नेता निवडल्यानंतर सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचं पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानाहून एक पत्र राज्यपालांना पाठविण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. ही प्रक्रिया पुढील दोन तासात पार पडेल. त्यानंतर सायंकाळी सुनित्रा पवार यांना कोणते खाते द्यायचे यासंदर्भात आज शासन निर्णय जारी केला जाऊ शकतो.

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी 

अजित पवार यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांना देण्यात यावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली होती. त्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी एकत्रित येत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख निवड केली आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. 

 सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा 

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्यानं सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवण्यात आला आहेत.  

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget