एक्स्प्लोर

काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केलेल्या सुलभा खोडके यांची अजित पवारांच्या पक्षातून वर्णी; पहिल्याच यादीत अमरावतीतून उमेदवारी

Amravati Assembly Constituency: काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केलेल्या आणि विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मधून, तर स्वात: बारामतीमधून अजित पवार, येवलामधून छगन भुजबळ इत्यादींसह अनेक दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे.

दरम्यान, या यादीत विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून (Amravati Assembly Constituency) आमदार सुलभा खोडके (Sulbha Khodke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा खोडके या काँग्रेसच्या (Congress) नेत्या असून त्यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षातून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्या अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाला असून  सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत वर्णी लागली आहे.

पहिल्याच यादीत वर्णी, अमरावतीतून उमेदवारी

राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील  288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आज  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी  जाहीर करण्यात आली आहे.  विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेत ही पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. 

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अनेकांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सेजल कदम आणि सुलभा खोडके यांनी आज पक्षात प्रवेश केला आहे. तसेच राज्यात कालपासून अनेक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दिला जातोय, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी

  1. बारामती- अजित पवार
  2. येवला- छगन भुजबळ
  3. आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
  4. कागल- हसन मुश्रीफ 
  5. परळी- धनंजय मुंडे
  6.  दिंडोरी- नरहरी झिरवाळ
  7. अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
  8. श्रीवर्धन-  आदिती तटकरे
  9. अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
  10.  उदगीर- संजय बनसोडे 
  11. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  12. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
  13. वाई- मकरंद पाटील
  14. सिन्नर- माणिकराव कोकाटे
  15. खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
  16. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
  17.  इंदापूर- दत्तात्रय भरणे
  18. अहमदपूर- बाबासाहेब पाटील
  19.  शहापूर- दौलत दरोडा
  20.  पिंपरी- अण्णा बनसोडे
  21.  कळवण- नितीन पवार
  22. कोपरगाव- आशुतोष काळे
  23. अकोले - किरण लहामटे
  24. वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  25. चिपळूण- शेखर निकम
  26. मावळ- सुनील शेळके
  27. जुन्नर- अतुल बेनके
  28. मोहोळ- यशवंत माने
  29.  हडपसर- चेतन तुपे
  30.  देवळाली- सरोज आहिरे
  31. चंदगड - राजेश पाटील
  32. इगतुरी- हिरामण खोसकर
  33. तुमसर- राजे कारमोरे
  34. पुसद -इंद्रनील नाईक
  35. अमरावती शहर- सुलभा खोडके
  36. नवापूर- भरत गावित
  37.  पाथरी- निर्णला विटेकर
  38. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

हे ही वाचा :

अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकून उमेश पाटील अडचणीत, रोहित पवारांचा विरोध, आता शरद पवारांना भेटणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget